परतीच्या पावसाने पिकांना झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:15+5:30

वणी तालुक्यातील शिरपूर, मेंढोली, पिंपरी, बोरगाव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, घोन्सा, कायर, रासा आदी गावशिवारात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सध्या कापूस फुटलेला आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. काही शेतात मजुरांअभावी वेचणी खोळंबली आहे.

The return rains hit the crops | परतीच्या पावसाने पिकांना झोडपले

परतीच्या पावसाने पिकांना झोडपले

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे : कापूस भिजला, सोयाबीनच्या शेंगांना फुटले अंकुर

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोरोनाच्या सावटात हंगाम साधणाऱ्या शेतकऱ्यांवर आता निसर्गानेच निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने हजेरी लावत असलेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. गुरवार व शुक्रवार, असे दोन दिवस वणी तालुक्यात कोसळलेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसला. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वणी परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी सकाळी वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेतात कापूस फुटला आहे. काही शेतकऱ्यांनी कापसाच्या वेचणीला सुरूवात केली आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने अनेक शेतातील कापूस ओला झाला आहे, तर सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटले आहे. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकांची नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहेत.
वणी तालुक्यातील शिरपूर, मेंढोली, पिंपरी, बोरगाव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, घोन्सा, कायर, रासा आदी गावशिवारात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सध्या कापूस फुटलेला आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. काही शेतात मजुरांअभावी वेचणी खोळंबली आहे. सोयाबीन पिकांची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने पिकांची नासधूस होत आहे. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. यंदाच्या हंगामात शेतकºयांना चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: The return rains hit the crops