शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शांततेची जबाबदारी मंडळांवर

By admin | Updated: August 20, 2014 23:46 IST

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

सार्वजनिक गणेशोत्सव : विघ्नसंतोषींवर पोलिसांचा वॉच - बिपीन बिहारीयवतमाळ : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी स्पष्ट केले.आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बिपीन बिहारी बुधवारी यवतमाळात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची क्राईम मिटींग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बिपीन बिहारी म्हणाले, सण-उत्सव हे आपली परंपरा असून त्याद्वारे समाजात एकोपा निर्माण होणे आवश्यक आहे. सण-उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे पुढाकार घेतात. मात्र अनेकदा ही मंडळे स्थिती बिघडल्यानंतर आपले अंग काढून घेतात आणि पोलिसांवर जबाबदारी लोटतात. परंतु आता हा प्रकार चालणार नाही. गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशाचे आगमन, मुक्काम आणि प्रस्थानापर्यंत कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याची, शांततेला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. शांततेची जबाबदारीच त्यांच्यावर सोपविली जाणार असून पोलीस त्यांच्या दिमतीला राहणार आहे. उत्सव काळात समाज विघातक कारवाया करणाऱ्या विघ्नसंतोषी घटकांवर पोलिसांची खास नजर राहणार आहे. त्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क निर्माण करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळ, संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, गणेशोत्सव स्थापनेची जागा, पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद अशा कोणत्याही कारणावरून उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असल्याने या प्रत्येक बाबी तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले. शांतता समिती, व्यापारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी यांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शांततेला आव्हान देऊ पाहणाऱ्या रेकॉर्डवरील आणि नव्या घटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाच्या अन्य विभागाची मदत घेण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि ठाणेदारांना दिलेले असल्याचे बिपीन बिहारी यांनी सांगितले. दरम्यान, क्राईम मिटींगमध्ये बिहारी यांनी काही ठाणेदारांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)