ठाणेदारासह फिर्यादीचे नोंदवले बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:29+5:30

अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. तसेच माजी आमदार विजयाताई धोटे यांनी जी तक्रार दिली त्यासंदर्भातही जमिनीचा ताबा घेण्याकरिता पोलिसांकडूनच रितसर परवानगी मिळाली. तरीही आकसापोटी पोलीस कारवाई करीत असल्याचे बाजोरिया यांनी तक्रारीत नमूद केले. याच तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांचा जबाब घेण्यात आला.

Reported statement of the plaintiff with Thanedar | ठाणेदारासह फिर्यादीचे नोंदवले बयाण

ठाणेदारासह फिर्यादीचे नोंदवले बयाण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील भूखंडाच्या तक्रारी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सुमीत बाजोरिया यांनी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याची तक्रार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली. या तक्रारीची चाैकशी करण्यासाठी खुद्द पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना मंगळवारी यवतमाळात आले होते. याशिवाय त्यांनी दुर्गा विसर्जन काळातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. 
सुमीत बाजोरिया यांनी ९ सप्टेंबर रोजी महासंचालकाकडे तक्रार करून अवधूतवाडी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगितले. ज्या जमिनीच्या संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाला यात निकालही लागला. 
त्याच संदर्भात अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. तसेच माजी आमदार विजयाताई धोटे यांनी जी तक्रार दिली त्यासंदर्भातही जमिनीचा ताबा घेण्याकरिता पोलिसांकडूनच रितसर परवानगी मिळाली. तरीही आकसापोटी पोलीस कारवाई करीत असल्याचे बाजोरिया यांनी तक्रारीत नमूद केले. याच तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांचा जबाब घेण्यात आला. शिवाय तक्रारदार प्रकाश टकले याचाही जबाब घेण्यात आला. 

पोलीस वसाहतीच्या कामांचीही घेतली माहिती 
- उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गोत्सव काळात बंदोबस्ताचा आढावा घेतला. याशिवाय पोलीस वसाहतीचे बांधकाम, पोलिसांसाठीचे गणवेश खरेदी प्रक्रियेचीही माहिती त्यांनी घेतली. सकाळी ११ वाजता उपमहानिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. दुपारी २ वाजेपर्यंत बैठक चालली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे व तीन उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Reported statement of the plaintiff with Thanedar

टॅग्स :Policeपोलिस