शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मामाने केला वारंवार अत्याचार; अल्पवयीन भाचीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 21:31 IST

Yawatmal News सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. यातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विष प्राशन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. यातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विष प्राशन केले. ही घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला गुरुवारी भादंवि ३७६, (२) (एन) ५०६, सहकलम ४, ६, ८ पोक्सो ऐक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. (Repeated atrocities committed by step-uncle; Poison taken by a minor niece)

पिडित अल्पवयीन मुलगी ही शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आजीसोबत राहते. आरोपी सावत्र मामा हा मळचा राजूर (चंद्रपूर) येथे राहतो. मात्र गेल्या एक वर्षापासून तो पिडीत मुलीच्या गावाला पत्नीसह रहात होता. नातलग असल्याने पिडित मुलीचे सावत्र मामासोबत बोलणे व्हायचे. यातूनच त्याने तिच्याशी जवळिक साधण्याचा प्रयत्न केला.एक दिवस घरी कुणी नसताना या मामाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर तिला व तिच्या वडिलांना ठार मारण्याची त्याने धमकीही दिली. जिवाच्या भीतीपोटी या मुलीने पुढे अनेक दिवस मामाचा अत्याचार सहन केला.

दरम्यान ती गरोदर असल्याचे लक्षात येताच, आरोपीने तिच्यावर दबाव टाकून तिला गर्भपाताच्या गोळ््या आणून दिल्या व गर्भपात करवला. मामाच्या या सततच्या अत्याचाराने त्रस्त होऊन तिने २० ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला चंद्रपूरला हलवण्यात आले.

उपचारानंतर तिने २५ ऑगस्ट रोजी शिरपूर पोलीस ठाणे गाठले. मात्र भीतीपोटी तिने तक्रार नोंदवली नाही. या घटनेचे गांभीर्य पाहता, २६ रोजी पोलिसांनी तिचे गाव गाठले व तिची तक्रार लिहून घेतली. पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग