रसवंती चालकाने दिला माणुसकीचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:05+5:30

अभय यांना आपले पाकीट हरविल्याचे लक्षात आले. त्यात रोख १२ हजारांसह वाहनाचे कागदपत्र, आधारकार्ड, एटीएम आदींचा समावेश होता. त्यांनी पाकीट मिळण्याची आशा सोडली होती. दरम्यान, १५ दिवसांनी रसवंतीचालक नामदेव सांगळे यांचा त्यांना भ्रमणध्वनी आला. त्यांनी चौधरी यांना पाकीट आढळल्याचे सांगितले. ते परत घेवून जाण्याची विनंती केली.

Rasvanti driver gave humanity the reality | रसवंती चालकाने दिला माणुसकीचा प्रत्यय

रसवंती चालकाने दिला माणुसकीचा प्रत्यय

googlenewsNext
ठळक मुद्देपाकीट परत : आर्णीच्या भाविकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील एक तरुण दर्शनासाठी गेला होता. तेथून परतताना त्याचे पाकिट एका रसवंतीवर हरविले. रसवंती चालकाने ते परत करून माणुसकीचा प्रत्यय दिला.
येथील अभय रामेश्वर चौधरी हा युवक आई-वडिलांसह शिर्डी येथे दर्शनाला गेला होता. परत येताना शनि शिंगणापूरचे दर्शन घेतले. रस्त्यात अहमदनगर जिल्ह्यातील गुटुंबी आखाडा गावालगत शेतातील रसवंतीवर थांबले. नामदेव सांगळे यांच्या रसवंतीवर ते विसावले. तेथून सर्व परत आले. गावी परतल्यानंतर अभय यांना आपले पाकीट हरविल्याचे लक्षात आले. त्यात रोख १२ हजारांसह वाहनाचे कागदपत्र, आधारकार्ड, एटीएम आदींचा समावेश होता. त्यांनी पाकीट मिळण्याची आशा सोडली होती. दरम्यान, १५ दिवसांनी रसवंतीचालक नामदेव सांगळे यांचा त्यांना भ्रमणध्वनी आला. त्यांनी चौधरी यांना पाकीट आढळल्याचे सांगितले. ते परत घेवून जाण्याची विनंती केली. त्यानुसार अभय चौधरी तेथे पोहोचले. त्यांना रसवंती चालकाने रोख १२ हजारांसह पाकीट परत केले. यातून त्यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला.
 

Web Title: Rasvanti driver gave humanity the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.