शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

रासा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मुदत असलेली औषधे जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्यानंतर त्यातून निघणाºया कडवट धुरामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे पोतराजे यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसरपंचांची तक्रार । वणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : औषधांची मुत संपली नसतानाही तालुक्यातील रासा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुमारे दोन पोते औषधे जाळण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी रासाच्या सरपंच मिरा पोतराजे यांनी वणी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रार केली असून कार्यवाहीची मागणी केली आहे.दरम्यान, पोतराजे यांनी यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्याकडेही तोंडी तक्रार केली. त्यानंतर आता औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्यानंतर त्यातून निघणाºया कडवट धुरामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे पोतराजे यांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर गावकरी व सरपंच मिरा पोतराजे यांनी रासा उपकेंद्रात कार्यरत परिचारीका रोहिनी खामनकर यांना विचारणा केली असता, खामनकर यांनी आम्हाला मुदतबाह्य असलेली औषधे पाठविण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे तीन गावांची जबाबदारी असल्याने औषधे वाटू शकली नाही, असाही युक्तीवाद खामनकर यांनी केल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे.यासंदर्भात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पोतराजे यांनी तक्रारीतून केली आहे. जाळण्यात आलेल्या औषधांपैकी काही औषधांची डिसेंबर महिन्यात मुदत संपणार होती, असेही पोतराजे यांचे म्हणणे आहे. तसे पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा पोतराजे यांनी केला आहे.रासा आरोग्य उपकेंद्रात औषधे जाळण्यात आल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने चौकशी केली जात आहे. सोमवारी १८ नोव्हेंबरला मी स्वत: रासा आरोग्य उपकेंद्रात जाऊन या प्रकाराची चौकशी करणार आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.- डॉ.विकास कांबळे,तालुका वैद्यकीय अधिकारी, वणीएक्सपायरी झालेली औषधे जाळताना त्यात एखादे एक्सपायरी न झालेले औषध जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्व जबाबदारी माझी असली तरी ज्यावेळी औषधी जाळली, त्यावेळी मी शासकीय कामाने बाहेर होते. मी स्वत: तपासणी करीत आहे.- रोहिनी खामनकर, परिचारीका

टॅग्स :doctorडॉक्टर