शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेमध्ये झाला ‘राडा’

By admin | Updated: May 30, 2015 02:30 IST

येथील नगरपरिषदेमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड ‘राडा’ घडून आला.

वणी : येथील नगरपरिषदेमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड ‘राडा’ घडून आला. यामध्ये मनसेच्याच नगरसेवकांनी एकमेकांना हाणामारी केली, तर महिला नगरसेवकांना शहरातील काही महिलांनी येऊन मारझोड केल्याची घटना घडली.वणी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी १ वाजता ठेवण्यात आली होती. ती वेळेवर सुरू झाली. काही विषय आटोपल्यानंतर येथील तलाव पाळीवरील नाल्याचा विषय पटलावर आला. या विषयावरून नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. सदर नाला वळवून दुसरीकडून नेण्याची मागणी काही नगरसेवक व नागरिकांनी केली होती. मागील सर्वसाधारण सभेत या विषयावर चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे ठरले होते. चौकशी समितीने काहीच केले नाही, असे म्हणून नगरसेवक अभिजीत सातोकर यांनी सभेत आवाज काढला. त्यावर आरोग्य सभापती धनंजय त्र्यंबके यांनी सांगितले की, चौकशी समितीने चौकशी केली असून अहवाल प्राप्त होताच त्यावर कारवाई केली जाईल. मात्र यामुळे अभिजीत सातोकर याचे समाधान झाले नाही. त्यांनी सरळ धनंजय त्र्यंबके यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. उपस्थित काही नगरसेवकांनी यात मध्यस्थी करून त्र्यंबके यांना दुसऱ्या दालनात नेऊन बसविले. त्याच दालनात सर्व १३ महिला नगरसेविकाही सुरक्षिततेच्या दृष्टीने बसल्या होत्या. एवढ्यातच बाहेरून २० ते २५ महिलांचे टोळके सभागृहात शिरले. त्यांनी धनंजय त्र्यंबके व महिला नगरसेविका बसून असलेल्या दालनाचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यांनी महिला नगरसेवकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात नगरसेविका आशाताई टोंगे, कीर्ती देशकर, अर्चना थेरे, पुष्पा कुळसंगे यांना मारहाण करून अर्वाच्च शिविगाळ केली. यानंतर सभा तहकूब करण्यात आली. दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. हजन परवीन बानो (४०) या महिलेच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात नगराध्यक्ष प्रिया लभाने, धनंजय त्र्यंबके व अर्चना थेरे यांनी ढकलून दिल्याने पायाला मार लागल्याचे त्यांनी म्हटले. दुसऱ्या बाजूने नगराध्यक्ष प्रिया लभाणे, आरोग्य सभापती धनंजय त्र्यंबके यांनीही नगरसेवक अभिजित सातोकर व सिद्दीक रंगरेज यांनी महिलांना अर्वाच्च व जातीवाचक शिविगाळ केल्याची तसेच महिला नगरसेविकांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी नगरपरिषदेच्या सामानाची नासधूस व नुकसान केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. नगरपरिषदेत शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे आता नगरपरिषद कुस्तीचा आखाडा बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून आता व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)