शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा प्रश्न अखेर निकाली

By admin | Updated: May 23, 2014 00:18 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला. संपूर्ण महाराष्टÑात समायोजनामुळे होणार्‍या बदल्या २० पटसंख्येच्या अटीमुळे जादा होणारे शिक्षक आरटीई अ‍ॅक्टमुळे जादा होणारे मुख्याध्यापकांची पदे यामुळे महाराष्टÑात पाच ते सहा हजार शिक्षकांचे स्थानांतरण होणार होते. तसेच पटसंख्येच्या अटीमुळे तीन हजार मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले होते. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा जवळपास ३०० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरलेले होते. त्यांचे समायोजन करताना सहायक शिक्षकावर अन्याय झाला आहे. मुख्याध्यापकांनासुद्धा सहायक शिक्षक या पदावर काम करावे लागत आहे. तसेच शाळेवर फार मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्याध्यापकांच्या समायोजनामुळे परिक्षेचा निकाल, टीसी देणे, पटनोंदणी, मुलांचे प्रवेश, पोषण आहार योजनेचा हिशेब, गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप आदी कामांमध्ये अडथळे निर्माण झालेले होते. अनेक मुख्याध्यापकांना पंचायत समितीबाहेर जावे लागत होते तर काही मुख्याध्यापकांना जिल्ह्याबाहेर सुद्धा जावे लागणार होते. या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजारामजी वरुटे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रा.एस.डी. पाटील, राज्य सरचिटणीस आप्पासाहेब कुल, बाळासाहेब तांबारे, अंबादास वाजे, सुभाष धवसे, प्रदीप गंधेवार, प्रकाश येरमे यांनी महाराष्टÑ शासनाशी चर्चा करुन मुख्याध्यापकाच्या समायोजनाचा महत्वाचा प्रश्न सोडविला आहे. आरटीई अ‍ॅक्टनुसार इयत्ता १ ते ५ साठी १५० पटसंख्येला एक मुख्याध्यापक तसेच ६ ते ८ साठी १०० पटसंख्येला एक मुख्याध्यापक असे धोरण निश्चित करण्यात आले होते. शासनाशी झालेल्या चर्चेनुसार इयत्ता १ ते ७ साठी एकूण पटसंख्या १५१ वर व त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना एक मुख्याध्यापक देण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांची पदे, शिक्षकांच्या बदल्या, समायोजन, शालेय पोषण आहार योजना, निमशिक्षक, अंशकालीन निदेशक, रजा सवलत, महिलांना बदल्यात सवलत या आणि अशा सर्व जटील मागण्या महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघानेच शासनाकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ध्येय धोरणाखाली एकत्रित यावे व या संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघटनेचे हात मजबूत करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुभाष धवसे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप गंधेवार, सुभाष पाचभाई, पुंडलीक बुटले, सुुंदरदास कांबळे, प्रकाश येरमे, भगवंत राऊत, राजेंद्र एकोणकार, संजय इंगोले, गुणवंतराव कोंबे, दिलीप वानखडे, प्रशिक नंदूरकर, विनोद पाटील डंभारे, मारोती उघडे, राजेंद्र गावंडे, अरुण सोनकुसरे, अनिता हाडे, अशोक म्हस्के, सुरेंद्र गडदे, सुनीता ढोणे, विद्या राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)