पुसद अर्बन बँकेला नचिकेत गौरव पुरस्कार

By Admin | Updated: October 5, 2015 02:38 IST2015-10-05T02:38:20+5:302015-10-05T02:38:20+5:30

उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल येथील पुसद अर्बन बँकेला २०१३-१४ चा विदर्भातून प्रथम क्रमांकाचा नचिकेत गौरव पुरस्कार नागपूर ...

Pusad Urban Bank gets Nachiket Gaurav Award | पुसद अर्बन बँकेला नचिकेत गौरव पुरस्कार

पुसद अर्बन बँकेला नचिकेत गौरव पुरस्कार


पुसद : उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल येथील पुसद अर्बन बँकेला २०१३-१४ चा विदर्भातून प्रथम क्रमांकाचा नचिकेत गौरव पुरस्कार नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
नचिकेत प्रकाशन, नागपूरच्यावतीने सर्वोत्तम अहवाल आणि सेवाकार्यासाठी नचिकेत गौरव पुरस्कार देण्यात येतो. या गौरव पुरस्कार समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे उपस्थित होते.
हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष राकेश खुराणा, संचालक सुधीर देशमुख, दीपक जाधव, नीळकंठ पाटील, संजय देशमुख व सामाजिक उपक्रम समितीचे प्रमुख ललित सेना यांनी स्वीकारला. महाराष्ट्रात पुसद अर्बन बँकेच्या ३८ शाखा आहेत.
यापूर्वी बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बँकेने कुष्ठरोग आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर या सारखे विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडल्याबद्दल ‘नचिकेत गौरव पुरस्कार’ पुसद अर्बन बँकेला प्राप्त झाला आहे. यापुढेही सामाजिक कार्यात बँक सदैव सहभागी राहील असा विश्वास बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pusad Urban Bank gets Nachiket Gaurav Award