पुसद, उमरखेड, महागाव तालुक्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:23+5:30

शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच ढिग मारुन आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंबे फुटू लागली आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Pusad, Umarkhed, Mahagaon taluka hit hard in return | पुसद, उमरखेड, महागाव तालुक्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा सोयाबीन

पुसद, उमरखेड, महागाव तालुक्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा सोयाबीन

ठळक मुद्देकपाशी : तोंडाशी आलेला घास हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/महागाव : परतीच्या पावसाने पुसदसह उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
तीनही तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत परतीचा पाऊस सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही जोरदार पावसाने तडाखा दिला. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांसह विडूळ परिसराला पावसाचा फटका बसला. सध्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करून शेतात ढिग मारुन ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच ढिग मारुन आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला.
सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंबे फुटू लागली आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी हादरुन गेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी भयभीत आहे. दरम्यान कृषी विभागाने काही परिसरात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

शेतातील उभ्या कपाशीलाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहे. पावसामुळे बोंडे गळतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कपाशीच्या उतारीत घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.

Web Title: Pusad, Umarkhed, Mahagaon taluka hit hard in return

टॅग्स :Rainपाऊस