शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची मस्ती, शेतकऱ्यांची जिंदगी झाली सस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली.

ठळक मुद्देपोळ्याची झडती : शेतकऱ्यांच्या व्यथा, राजकीय नेत्यांवर हल्लाबोल, मनातील खदखद व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती, शेतकºयांची जिंदगी झाली हो सस्ती, कापसाचे बोंड अळीने पोखरले, शेतकरी मरतो हो विषाच्या फवारणीने, एक नमन कवडा पार्वती हर बोला हरहर महादेव’, यासारख्या अनेक झडत्यांनी यवतमाळचा बैलपोळा दणाणून गेला. येथील ऐतिहासिक आझाद मैदानात भरलेल्या बैल पोळ्यात शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांनी झडत्यांच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.स्थानिक आझाद मैदानात बैल पोळा पार पडला. पंचक्रोशीतील बैलजोड्या या ठिकाणी आल्या. यावर्षी ९४ बैल जोड्यांनी पोळयाच्या उत्सवात हजेरी लावली होती. सुदृढ बैल व सजावटींना बक्षीस वितरित करण्यात आले.या स्पर्धेत संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला १५ हजारांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अंकुश बगमारे यांच्या बैलजोडीने १० हजाराचे दुसरे, दीपक सुुलभेवार यांच्या बैलजोडीने सात हजारांचे तिसरे, नामदेव अवथळे यांच्या बैलजोेडीने पाच हजारांचे चौथे, तर पिंटू ठाकरे यांच्या बैलजोडीने तीन हजारांचे पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.रमेश यमसनवार, अविनाश ठाकरे, राजेश ठाकरे, दिनेश तिवडे, अजय रापर्तीवार यांच्या बैलजोडींना प्रोत्साहनपर बक्षिसाच्या स्वरूपात दोन हजार रूपयांचा रोख इनाम मिळाला. इतर बैलजोडी मालकांना धोतरजोडी आणि टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. त्री सदस्यीय समितीने बैलजोडींचे परीक्षण केले. समितीत अ‍ॅड.रवींद्र भुमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाटाणे, डॉ.चव्हाण, अ‍ॅड.जयसिंग चव्हाण यांचा समावेश होता.यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, नगरसेवक नित्यानंद गिरी, गजानन इंगोले, बबलू देशमुख, उद्धवराव साबळे, पंकज देशमुख, विशाल पावडे, वैशाली कनाके, शुभांगी हातगावकर, संगीता कासार, सुषमा राऊत, नीता धावतोडे उपस्थित होत्या.पोळ्यात दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथील नितीन कोल्हे यांच्या झडतीचे वाचन करण्यात आले. बबलू देशमुख, अशोक भुतडा यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध झडत्या सादर केल्या. या झडत्यांनी पोळ्याच्या उत्सवात रंगत भरली. झडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सत्तादाऱ्यांवर आसूड ओढले.झडतीतून मुख्यमंत्र्यांवर साधला नेम‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली. एकापेक्षा एक सरस आणि शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर झडत्या सादर करून शेतकऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी