मारेगावात पोलीस जमादाराला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:15+5:30

जमादार मधूकर मुके हे सकाळी इसार पेट्रोल पंपावर दुचाकीने पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्याचवेळी पंपावर (एम.एच.३४-बी.एच.२१००) पेट्राल खाली करण्यासाठी एक टँकर आले. पेट्रोल खाली केल्यानंतर टँकरमध्ये शिल्लक असलेले पेट्रोल टँकर हलवून बाहेर काढण्यासाठी टँकर चालकाने टँकर वेगाने पुढे पळविले.

Police jammer crushed by truck in Marega | मारेगावात पोलीस जमादाराला ट्रकने चिरडले

मारेगावात पोलीस जमादाराला ट्रकने चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : उमरी येथील वायरलेस कक्षातील ड्युटी आटोपून मारेगावकडे परत येणाऱ्या एका पोलीस जमादाराला पेट्रोलच्या टँकरने चिरडले. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करणवाडीलगत असलेल्या इस्सार पेट्रोलपंपावर घडली.
मधुकर नीळकंठ मुके (५०) असे मृत पोलीस जमादाराचे नाव आहे. उमरी येथून परत येताना ते पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले. जमादार मधूकर मुके हे सकाळी इसार पेट्रोल पंपावर दुचाकीने पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्याचवेळी पंपावर (एम.एच.३४-बी.एच.२१००) पेट्राल खाली करण्यासाठी एक टँकर आले. पेट्रोल खाली केल्यानंतर टँकरमध्ये शिल्लक असलेले पेट्रोल टँकर हलवून बाहेर काढण्यासाठी टँकर चालकाने टँकर वेगाने पुढे पळविले. यावेळी दुचाकीस्वार जमादार मुके टँकरचालकाला दिसले नाही. त्यामुळे जमादार मुके भरधाव टँकरने त्यांना जागेवरच चिरडले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Police jammer crushed by truck in Marega

टॅग्स :Accidentअपघात