शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : क्षमता ४४ बेडची, प्रत्यक्ष दाखल झालेत शंभरावर बालरुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात अद्ययावत अतिदक्षता उपचार कक्ष तयार केला जात आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वार्ड तयार करण्यात आला. त्या ठिकाणी उपलब्ध क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा अधिक रुग्ण आहेत. एका बेडवर तीन-तीन बालक उपचार घेत आहे. अनेक समस्या या वार्डमध्ये निर्माण झाल्या आहेत.तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत. शिवाय लिफ्ट लावलेली असूनही कार्यान्वित करण्यात आली नाही. त्यामुळे वार्डात लागणारी औषधी व इतर साहित्य पायऱ्यांवरूनच आणावे लागत आहे. अनेकदा तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यावरच औषधांचे खोके द्यावे लागते. शिवाय आजारी मुलांना घेऊन कुठल्याही तपासणीसाठी अपघात कक्षाजवळच्या एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणीसाठी चकरा माराव्या लागतात. अनेकदा मुलांच्या माता-पित्यांना लहान मुलांना घेऊन ताटकळत बसून रहावे लागते. रविवारी रात्री ८ वाजता योगीता राठोड रा. चाणी ता. दारव्हा या मुलीला घेऊन तिचे वडील एक्स-रेसाठी बसून होते. तब्बल चार तास वाट पाहिल्यानंतरही तंत्रज्ञ त्या विभागात फिरकलाच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.संसर्गाचा धोका वाढलाउपचारासाठी आलेल्या मुलांची प्रकृती सुधारण्याऐवजी वार्डात दाखल झाल्यानंतर आणखी गंभीर होत आहे. मुलांना वार्डात आल्यानंतर गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. शिवाय टीबी सारखा संसर्गजन्य वार्ड बालरुग्ण विभागाच्या वार्डाला लागून आहे. यामुळे संसर्गाचा धोका आणखीच निर्माण झाला आहे. अनेक बालक उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा आजारी पडत आहे.ट्रान्सफार्मर जळाल्याने वीज गूलमेडिकल परिसरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. व्हेन्टीलेटरवर असलेल्या रुग्णांना चक्क अम्बू बॅगच्या सहाय्याने कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करावा लागला. सकाळी ७ वाजता बंद झालेला वीज पुरवठा दुपारी १२ नंतरच सुरळीत झाला. यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जीवरक्षक प्रणाली कार्यान्वित ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.मेडिकलचे सर्वच वार्ड हाऊसफुल्ल झाले आहे. क्षमतेपेक्षा किती तरी अधिक रुग्ण येत आहे. बाह्यरुग्ण तपासणी २६२७ रुग्ण आले. या पैकी २५० रुग्ण भरती होतात. फवारणी विषबाधा रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका दिवशी १७ रुग्ण दाखल झाले. मर्यादित साधने व मनुष्यबळावर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.जुन्या इमारतीत लिफ्ट लावली आहे. मात्र आर्किटेक विभाग मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र आले नसल्याने लिफ्टचा वापर करता येत नाही. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- रिता बोकडेअभियंता, विद्युत विभाग.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल