शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत, आरोग्यमध्ये जुंपली

By admin | Updated: October 7, 2016 02:37 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरूवारी पंचायत आणि आरोग्य विभागात फॉगींग मशीनवरून चांगलीच जुंपली.

स्थायी समिती : फॉगींग मशीनद्वारा ग्रामीण भागात फवारणी सुरूच नाहीयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरूवारी पंचायत आणि आरोग्य विभागात फॉगींग मशीनवरून चांगलीच जुंपली. शिवाय कृषी, शिक्षण विभागावरूनही चांगलीच खडाजंगी उडाली.अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीत आरोग्य व पंचायत विभाग प्रमुखांमध्येच जुंपली. प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांनी ४८ फॉगींग मशीन उपलब्ध असून फवारणीसाठी संबंधित ग्रामपंचायतींना खर्च वहन करावा लागतो, असे सांगितले. मात्र ग्रामपंचायती खर्च सहन करण्यास तयार नसल्याने ग्रामीण भागात फवारणी केली जात नाही, असे स्पष्ट केले. यावर पंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हरकत घेत चक्क फॉगींग मशीनच बंद असल्याचे उघड केले. ग्रामपंचायती फवारणीचा खर्च उचलण्यास तयार आहे. मात्र फॉगींग मशीन बंद असल्याने फवारणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत कृषी विभागातून दोन पुरवठादारांपैकी एकाचे देयक गहाळ झाल्याचा मुद्दा प्रवीण देशमुख यांनी उपस्थित केला. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे कृषी अधिकारी जगन राठोड यांनी सांगितले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने देशमुख यांनी याप्रकरणी कोणती पावले उचलली, असा प्रश्न केला. दुसरे देयक बोलावून संबंधित पुरवठादाराचे देयक देण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. देवानंद पवार यांनी शिक्षक समायोजनाचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षण विभागाने शासन निर्णयावर ग्रामविकास विभागाऐवजी विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मार्गदर्शन मागवून समायोजन केल्याचे सांगितले. सदस्यांना प्रशासन मूर्ख समजते काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बैठकीत कळंब तालुक्यातील किन्हाळा येथील पाझर तलावाचा प्रश्नही गाजला. किन्हाळा येथे जानेवारी २0१४ मध्ये पाझर तलावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. भूसंपादनासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ६५ लाखांच्या निधीची मागणीही करण्यात आली. तथापि अद्याप निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात निधीची मागणी करण्यात आली की नाही, याबाबत बैठकीत साशंकता व्यक्त केली गेली. याशिवाय बैठकीत नरेगा, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, रस्ता व शाळा बांधकाम, कामगार संस्था, बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक पुतळा सौंदर्यीकरण आदी विषयांवरही चर्चा झाली. (शहर प्रतिनिधी)झरीतील घरकूल लाभार्थी संकटातस्थायी समितीच्या बैठकीत घरकुलाच मुद्दाही उपस्थित झाला. झरी तालुक्यात १५७ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले. काही लाभार्थ्यांनी घरकूल मंजूर होताच जुने घर पाडून नवीन बांधकामाला सुरूवात केली. काहींनी अर्धवट बांधकामही केले. मात्र ३१ मार्चपूर्वी याप्रकरणी प्रशासकीय मान्यताच घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लाभ देता येत नाही, असे बैठकीत सांगण्यात आले. परिणामी आता हे लाभार्थी संकटात सापडले आहे.