हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:24+5:30

निर्मल गावाच्यादृष्टीने १०० टक्के ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरणासाठी नवीन उद्योगास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजना, लोकशाही कारभार, मतदान यासारखे उपक्रम याठिकाणी राबविले गेले. यात सातत्य असावे, अशी मागणी गावकऱ्यांना घालण्यात आली.

This is our prayer, and this is our prayer | हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे

हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । बरबडा गावात आठ दिवस पार पडला दान उत्सव, उद्योग उभारणी, स्वच्छता, शिक्षण व गुणवत्तेसाठी जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सक्षमीकरणासाठी महिलांनी नवीन उद्योगाची उभारणी करावी, सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता राखा, शिक्षण घ्या, शैक्षणिक गुणवत्ता सुधारा, असे दान बरबडा या गावात उत्सवाच्या माध्यमातून मागण्यात आले. गावात मोठा बदल व्हावा, अशी प्रार्थनाही यानिमित्ताने करण्यात आली.
यवतमाळ तालुक्यात येत असलेल्या बरबडा या गावात ‘स्वच्छता ही सेवा आणि दान उत्सव’ पार पडला. तब्बल आठ दिवस विविध उपक्रम गावकऱ्यांच्या साथीने राबविण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढून गावस्वच्छतेचे संदेश देण्यात आले. सोबतच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, रिलायन्स फाऊंडेशन, अनुलोम फाऊंडेशन, प्रयास फाऊंडेशन या अंतर्गत आठ दिवस दान उत्सव साजरा करण्यात आला.
निर्मल गावाच्यादृष्टीने १०० टक्के ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरणासाठी नवीन उद्योगास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजना, लोकशाही कारभार, मतदान यासारखे उपक्रम याठिकाणी राबविले गेले. यात सातत्य असावे, अशी मागणी गावकऱ्यांना घालण्यात आली. गाव परिसरातील प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. हातपंप, सार्वजनिक विहिरीजवळील कचरा साफ करण्यात आला. गावाला सॅनिटरी नॅप्कीन डिस्पोझल मशीन देण्यात आली. याचा उपयोग कसा करावा, याविषयी माहिती देण्यात आली.
रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संदीप वायाळ, दिलीप जाधव, प्रयासचे प्रशांत बनगीनवार, मंगेश खुने, वसंत व्यवहारे, अनुलोम संस्थेचे जिल्हा सन्वयक सुरज बाघाडकर, सुरज भाकरे, सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली मेश्राम, ग्राम परिवर्तक दिनेश खडसे, गणेश झिंगरे, कांचन ठाकरे, विठ्ठल गोरे, मुख्याध्यापिका वनमाला वंजारी, शिक्षक गुणवंत कोंबे, विशाल मेश्राम, ग्रामसेवक श्रीकांत बन्सोड, संत कबीर संस्थेचे अध्यक्ष अरविंद बोरकर, देशमुख, संदीप चव्हाण, संगीता बोईकर, सुषमा राऊत, आशा कुत्तरमारे, रेखा शेंडे आदींनी या उत्सवात परिश्रमाचे दान दिले.

Web Title: This is our prayer, and this is our prayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.