ऑनलाईन शस्त्र खरेदीदार पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:27+5:30

शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अ‍ॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून ३९ जणांनी शस्त्राचे बुकींग केल्याचे आढळून आले. यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करीत आहे.

Online Weapons Buyers on the Police Radar | ऑनलाईन शस्त्र खरेदीदार पोलिसांच्या रडारवर

ऑनलाईन शस्त्र खरेदीदार पोलिसांच्या रडारवर

Next
ठळक मुद्दे३९ जणांची यादी : पाच जणाविरुद्ध कारवाई, ‘एलसीबी’ने शॉपिंग साईटकडून मागविला डाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अ‍ॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून ३९ जणांनी शस्त्राचे बुकींग केल्याचे आढळून आले. यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करीत आहे.
गुन्हेगारी वर्तुळात व काही हौसी तरुणांकडून शस्त्र बाळगण्याची क्रेझ वाढली होती. यातूनच ऑनलाईन शस्त्र खरेदीला यवतमाळ शहरासह जिल्ह्यातून पाठबळ मिळत होते. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद चव्हाण यांनी तपास सुरू केला. थेट त्या वेबसाईटकडे शस्त्र खरेदी करणाऱ्यांचा डाटा मागविण्यात आला. एका वेबसाईटच्या डाटानुसार यवतमाळातून ३९ जणांनी शस्त्र बुकिंग केले. या पैकी १५ शस्त्र डिलीव्हर झाले आहे. दोघांची डिलीव्हरी फेल गेली. दोघांनी डिलीव्हरी रिजेक्ट केली. पोलीस कारवाई होत असल्याचे पाहून बुकींग करणाऱ्या १८ जणांनी आपले बुकींग कॅन्सल केले. ऑनलाईन चाकू खरेदी करणाºया पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ३७, १, ३ कलमानुसार तसेच मुंबई पोलीस कायद्यातील कलम १३५ नुसार कारवाई केली जात आहे. चाकू व इतर शस्त्र मागविणाऱ्यांचा क्राईम रेकॉर्ड तपासून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून जाहीर आवाहनही करण्यात आले होते.

इतरही शॉपिंग वेबसाईटची पडताळणी
ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या इतरही काही प्रमुख वेबसाईटकडे शस्त्र विक्रीचा डाटा मागविण्यात येत आहे. हा डाटा मिळताच आणखी शस्त्र खरेदी करणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हौसे खातरही शस्त्र खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यांना पोलिसांकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेकांची धाबे दणाणले आहे.

Web Title: Online Weapons Buyers on the Police Radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shoppingखरेदी