ऑनलाईन नामांकनाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:25+5:30

रवींद्र चांदेकर । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाईन झाल्या आहे. नागरिक घरबसल्या मोठमोठ्या वस्तूंची ...

Online Nomination | ऑनलाईन नामांकनाकडे पाठ

ऑनलाईन नामांकनाकडे पाठ

Next
ठळक मुद्देप्रशासन हतबल : सुविधेचा लाभच नाही, प्रत्यक्ष नामांकनावर भर

रवींद्र चांदेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आधुनिक युगात सर्वच बाबी ऑनलाईन झाल्या आहे. नागरिक घरबसल्या मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करीत आहे. प्रशासनातही ऑनलाईनला भलतेच महत्व प्राप्त झाले. मात्र निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामांकन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही उमेदवारांनी त्याकडे पाठ फिरविल्याची प्रचिती येत आहे.
निवडणूक आयोगाने हायटेक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार उमेदवारांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. यापूर्वीच्या लोकसभा आणि त्यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभेल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याची प्रचिती येत आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीमध्ये ऑनलाईन नामांकनाला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात नामांकन अर्ज दाखल करण्यावरच सर्व उमेदवारांचा जोर दिसत आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुविधा कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.
पूर्वीपासून सर्वच पक्षीय व अपक्ष उमेदवारांमध्ये वाजत-गाजत जाऊन अर्ज भरण्याची परंपरा आहे. यातून पक्ष आणि उमेदवार आपले शक्ती प्रदर्शन करतात. अर्ज भरताना सोबत किती कार्यकर्ते आहे यावरून त्यांचे निवडणुकीचे गणित लावले जाते. त्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव करून मिरवणुकीने अर्ज भरण्यासाठी जातात. तोच पायंडा अद्यापही कायम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध करून देऊनही उमेदवार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हल्ली निवडणुकीत अनेक उच्च शिक्षितही उमेदवार म्हणून उभे ठाकतात. मात्र अशा उमेदवारांनीही ऑनलाईन नामांकनाकडे दुुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अद्याप सुरूवात झाली नाही. २७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. मात्र यावेळीही उमेदवार वाजतगाजत जाऊन नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे.

वाजतगाजत जाण्याकडेच सर्व उमेदवारांचा कल
ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्डकॉपी (प्रिंटआऊट) संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. त्यावेळी संबंधित उमेदवाराला शपथ घ्यावी लागते. याप्रक्रियेता उमेदवाराचा वेळ वाचतो. प्रशासनालाही सुविधा होते. मात्र उमेदवार प्रत्यक्ष अर्ज भरत असल्याने ऑनलाईन नामांकन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.

Web Title: Online Nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.