कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:23+5:30

नाशिकला कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाहेर देशातुन कांदा आयात करण्यात आला. यानंतरही कांद्याचे दर तेज आहेत. वातावरणातील बदलाने काद्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. यामुळे येत्या काळात कांद्याला आणखी चांगले दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यातून जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Onion cultivation area increased | कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले

कांद्याचे लागवड क्षेत्र वाढले

Next
ठळक मुद्देदर वाढण्याची आशा : जिल्ह्यात भाजीपाला लागवडीत घट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची तयारी पूर्ण केली आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यात नवे दृष्य पहायला मिळणार आहे.
कांद्याला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्ह्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकला कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाहेर देशातुन कांदा आयात करण्यात आला. यानंतरही कांद्याचे दर तेज आहेत. वातावरणातील बदलाने काद्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. यामुळे येत्या काळात कांद्याला आणखी चांगले दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यातून जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कांदा लागवडीचे बिज कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. यामध्ये पांढºया कांद्याच्या बियाण्याला सर्वाधिक मागणी आली आहे. बाजारात कांद्याच्या बियाण्याचे दर स्थिर आहेत. यामुळे बियाण्याची लागवड वाढली आहे. ४५० रूपये किलो दराने कांद्याचे बियाणे विकले जात आहे.
कांद्याचे प्लॉटही लागताहेत
बियाण्याची मागणी पाहता शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हे बियाणे खरेदी करण्यासाठी काही कंपन्याही पुढे येत आहेत. यामुळे बियाण्याच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाचे नियोजन कोलमडणार
हवमानातील बदलाने कृषी विभागाच्या नियोजनाला अचनक कलाटनी मिळण्याची शक्यता आहे. निर्धारीत क्षेत्राला डावलीत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड सुरू केली आहे. यामुळे एकूण लागवडीचे नियोजनच कोलमडण्याचा धोका आहे.

Web Title: Onion cultivation area increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.