कोविड वार्डात दररोज लागतात दीडशे ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:43+5:30

वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमित पुरवठा केला जात आहे.

One and a half hundred oxygen cylinders are required daily in Kovid ward | कोविड वार्डात दररोज लागतात दीडशे ऑक्सिजन सिलिंडर

कोविड वार्डात दररोज लागतात दीडशे ऑक्सिजन सिलिंडर

Next
ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : तिप्पट वापर, पुरवठा मात्र मुबलक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा रुग्णाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यामुळेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. येथे कोविड वॉर्डामध्ये दिवसाला १५० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमित पुरवठा केला जात आहे.
पूर्वी रुग्णालयात दिवसाला ४० ते ५० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. त्यावेळी केवळ एकच ऑक्सिजन युनिट कार्यरत होते. कोविड काळात जुन्या इमारतीमध्ये नव्याने दोन ऑक्सिजन युनिट तयार केले आहे. यामध्ये एका वेळी १५० सिलिंडर लावण्याची सुविधा आहे. थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पूर्ण दाबाने ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. त्यासाठी ही व्यवस्था केली आहे. आता कोविड रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचा करार झाला असल्याने १९० रूपयांत सिलिंडर रिफिल करून मिळत आहे. प्रसंगी युनिट वाढविण्यास प्रशासन सज्ज आहे.

९५ टक्के प्रमाण गरजेचे
कोविड रुग्णाला बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. त्यासाठीही ऑक्सिजन महत्वाचा आहे. त्यादृष्टीने सोयी सुविधा तयार केल्या आहेत. कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९५ टक्केपेक्षा अधिक ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोविड उपचारातील हा एक महत्वाचा घटक आहे. त्याबाबत परिपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे.

Web Title: One and a half hundred oxygen cylinders are required daily in Kovid ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.