शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनो, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा

By admin | Updated: October 5, 2015 02:33 IST

चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

बळीराजा चेतना अभियान : पशु व मत्स्य पालनास प्रोत्साहन देण्याची पालकमंत्र्यांची सूचनायवतमाळ : चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते.कृषी, पशु, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय विभागांनी शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्या लवकरात लवकर स्थापन करून समित्यांचे काम सुरु झाले पाहिजे. कमी खर्चात आणि कोरडवाहू शेती चांगल्या पध्दतीने करता यावी म्हणून कृषी विभागाने या पध्दतीबाबत प्रचार व प्रसार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ दिला जावा. अन्नसुरक्षा योजनेसह प्राधान्य कुटुंबातील योजनेसाठी पात्र शेतमजूर, भूमिहीनांचा यादीत समावेश करण्यात यावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार यांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची तसेच अभियानाच्या प्रगतीची माहिती सादर केली. शेवटी खवले यांनी मान्यवरांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)