शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आता शाळांमध्ये तक्रार पेट्या

By admin | Updated: June 4, 2017 01:13 IST

विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणे आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ही पेटी बसविणे सक्तीचे केले आहे.

शिक्षणचा निर्णय : विद्यार्थिनींच्या छेडखानीला बसणार आळाअखिलेश अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणे आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ही पेटी बसविणे सक्तीचे केले आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर आता सर्व शासकीय, खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. ही पेटी बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. शाळेच्या दर्शनी भागात अथवा प्रवेशद्वारानजीक ही पेटी बसविण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. ही तक्रार पेटी पुरेशी मापाची व सुरक्षित असावी, असे निर्देशही शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामाकाजाच्या दिवशी उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पोलीस पाटील, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही पेटी उघडली जाणार आहे. या पेटीतून प्राप्त झालेल्या संवेदनशील तक्रारींबाबत पोलीस यंत्रणेचे मत घेतले जाणार आहे. सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारणासाठी योग्य कारवाई करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या तक्रार पेटीत तक्रार टाकणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसह इतरांच्याही तक्रारींचे निरसन केले जाणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शाळांना जारी केल्या आहेत. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्तया पेटीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्व प्रकारच्या तक्रारी टाकता येणार आहे. शालेय परिसर किंवा शाळेत येताना व जाताना प्रवासात होणारी छेडछाड, विद्यार्थिनीचे शोषण आदींबाबत तक्रार करता येईल. वाहतूकदारांकडून होणाऱ्या पिळवणुकीबाबत तसेच रोडरोमिओंबाबतही तक्रार करता येणार आहे. या सर्व तक्रारकर्त्यांचे नाव मात्र गुप्त ठेवले जाणार आहे. शासनाचा हा निर्णय योग्य व चांगला आहे. आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल. - विजय कडूमुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, करंजी