शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात कोरोना रुग्णांची नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसंसर्ग वेगाने वाढतोयं : पुन्हा ४० रुग्णांची भर, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९२

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.नव्याने ४० पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी आठजण हनुमान वॉर्डातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून हे सर्वजण यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले होते. इतर ३२ जण मस्जिद वार्ड परिसर व शहरातील अन्य भागातील आहेत.पांढरकवडा शहरात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे प्रशासनावरील ताण चांगलाच वाढला आहे. नागरिकही धास्तावून गेले आहेत.नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पांढरकवडा शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. इतरही काही ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत असून तपासणी अहवाल काय येतो, याकडे नागरिकारंचे लक्ष लागले आहे.ज्या भागातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला, तो परिसर प्रशासनाच्यावतीने सील करण्यात येत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अर्धे पांढरकवडा शहर सील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वत:ची काळजी घ्यावी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरातच सुरक्षित थांबावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय तोडासे यांनी केले आहे.यवतमाळच्या पथकाने केली पाहणीयवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी पांढरकवडा शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मस्जिद वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड व हनुमान वॉर्डा परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना काही सुचनाही केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या