बाभूळगाव येथे भरधाव कार दुभाजकावर धडकून नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:46+5:30

सुरेशचंद तातेड (रा. बाभूळगाव) हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वाहनाने अमरावती जिल्ह्यातील धनोडी येथे जात होते. यावेळी चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन भरधाव वेगाने रस्ता दुभाजकावर आदळले. यामुळे वाहनात बसलेले प्रवासी समोरील काच फुटल्याने रस्त्यावर फेकले गेले. हा भीषण अपघात सकाळी वर्दळीवेळी घडला. गावातील कुटुंब असल्याने सर्वचजण मदतीला धावून आले.

Nine injured in car crash in Babhulgaon | बाभूळगाव येथे भरधाव कार दुभाजकावर धडकून नऊ जखमी

बाभूळगाव येथे भरधाव कार दुभाजकावर धडकून नऊ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : येथील बसस्थानक परिसरात अमरावतीकडे जात असलेली कार रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. अपघातातील जखमींना यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
सुरेशचंद तातेड (रा. बाभूळगाव) हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वाहनाने अमरावती जिल्ह्यातील धनोडी येथे जात होते. यावेळी चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन भरधाव वेगाने रस्ता दुभाजकावर आदळले. यामुळे वाहनात बसलेले प्रवासी समोरील काच फुटल्याने रस्त्यावर फेकले गेले. हा भीषण अपघात सकाळी वर्दळीवेळी घडला. गावातील कुटुंब असल्याने सर्वचजण मदतीला धावून आले. सर्व जखमींना तातडीने बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना यवतमाळमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 
या अपघातातील जखमींमध्ये सुरेशचंद तातेड, मनोज तातेड, गोटू तातेड, माजी नगरसेविका तातेड यांच्यासह एका बालकाचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. बाभूळगाव बसस्थानक परिसरात दुभाजकावर धडकून यापूर्वीही अनेक अपघात झाले.

 

Web Title: Nine injured in car crash in Babhulgaon

टॅग्स :Accidentअपघात