शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By admin | Updated: January 16, 2017 01:10 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये महागाव तालुक्यात छोट्यामोठ्या चोऱ्या व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

 महागाव : गेल्या काही महिन्यांमध्ये महागाव तालुक्यात छोट्यामोठ्या चोऱ्या व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. महागाव तालुक्यात सध्या मटका, जुगाराच्या केसेस पलिकडे पोलिसांची विशेष काही कामगिरी दिसून येत नाही. बहुतांश पोलीस कर्मचारी मुख्यालयी राहातच नाही. त्यामुळे ते सायंकाळी ६ वाजताच महागाव येथील पोलीस कर्मचारी पुसद व यवतमाळ सारख्या शहरांकडे रवाना होतात. अशा स्थितीत रात्रभर नागरिक डोळ््यात तेल घालून स्वत:च गस्त घालत आहेत. वाढत्या चोऱ्या, घरफोडी, शेतातील अवजारे व माल चोरी या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. तालुक्यातील पाच संवेदनशील असलेल्या ठिकाणी गावठी दारुचे गाळप आणि सुरू असलेले जुगारांचे अड्डे बंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. फुलसावंगी, मुडाणा, काळी टेंभी, सवना आणि कोनदरी येथील पोलीस कार्यकाळ तपासला असता या गावांमध्ये अनेक वेळा अवैध धंद्यातून पोलिसांवरच हल्ले झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. कोनदरी येथे तर एका जमादाराचेच बोट तोडण्यात आले होते. त्या आरोपीला पुढे तीन वर्षांची शिक्षा झाली. फुलसावंगी येथे व्यापाऱ्यांना धमक्या देणे, दरोडे, खून अशा घटना सातत्याने सुरू आहेत. मुडाणा येथील गावठी दारू गाळपाचे अड्डे नष्ट करण्यासाठी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांना लक्ष घालावे लागले होते. याठिकाणी पुन्हा आता तीच परिस्थिती सुरू झाली आहे. बीट जमादारांची उल्लेखनीय कामगिरी नाही. वर्षानुवर्षे एकच बीट जमादार कार्यरत आहेत. (शहर प्रतिनिधी)