Mutka, not the gambling crowd, is Corona threat? | मटका, जुगार अड्ड्यावरील गर्दीला नाही का कोरोनाचा धोका ?

मटका, जुगार अड्ड्यावरील गर्दीला नाही का कोरोनाचा धोका ?

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : यवतमाळात ठिकठिकाणच्या मटका काऊंटरवर गर्दीच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्वच उपाययोजना केल्या जात आहे. असे असले तरी यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील मटका व जुगार अड्ड्यांवरील गर्दी कायम आहे. बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या या अड्ड्यांना जमावबंदी आदेश लागू नाही काय असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मटका व जुगार समाज स्वास्थ्यासाठी घातक असल्याने त्याला कायदेशीर मान्यता नाही. केवळ पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय राजरोसपणे सुरू असतात. यवतमाळ जिल्ह्यात तीनशेच्यावर मटका काऊंटर तर दीडशे जुगार क्लब आहे. यातून मोठी आर्थिक उलाढालही होते. संपूर्ण जिल्ह््याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना हा अवैध व्यवसाय तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. या उलट पानटपऱ्या, हॉटेल्स, बार याला बंदी घालण्यात आली आहे. आता तर हेअर सलूनही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. प्रशासन एकीकडे नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांना गर्दी टाळण्यासाठी सहकार्याची अपेक्षा करीत आहे. बहुतांश जणांनी प्रशासनाच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पानठेले बंद होते.
एकीकडे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दैनंदिन रोजी रोटीचा व्यवसाय बंद ठेवला जात आहे. याच्या विपरित चित्र अवैध धंदेवाल्यांचे आहे. त्यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, जमाबंदी आदेश लागू नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मानवी आरोग्याला धोका उत्पन्न करणाºया कोरोना थांबविण्यासाठी सर्वच घटक सहकार्याची भूमिका घेऊन काम करीत आहे. शासकीय कार्यालयात, न्यायालयात गर्दी टाळण्याचे सक्त आदेश दिले आहे. अशाही परिस्थितीत चिरीमिरी घेऊन मटका, जुगार अड्ड्यांना अभय देणाºया पोलीस यंत्रणेने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीच पावले उचलली नसल्याचे दिसून येते.

कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. अधिकृत, अनधिकृत ठिकाणेसुद्धा गर्दी झालेली चालणार नाही. पोलीस प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात येईल.
- एम.डी. सिंह
जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Web Title: Mutka, not the gambling crowd, is Corona threat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.