शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समिती अध्यक्षांची मानधन वितरणात थट्टा

By admin | Updated: October 14, 2016 03:07 IST

गावातील तंटे गावातच मिटविली जावी, यासाठी तंटामुक्त गाव समित्या तयार करण्यात आल्या आहे.

महिना ८३ रुपये : ग्रामसेवकाकडे अर्ज करून वर्षातून दोनदा उचलावी लागते रक्कमकिशोर वंजारी  नेरगावातील तंटे गावातच मिटविली जावी, यासाठी तंटामुक्त गाव समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या अध्यक्षाची मात्र मानधनाच्या बाबतीत थट्टा सुरू आहे. दरमहा केवळ ८३ रुपये मानधनावर या अध्यक्षांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. वाद गावातील असो वा कौटुंबिक त्यांच्यात समेट घडवून आणत पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण जावू नये, यासाठी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला मोलाची भूमिका पार पाडावी लागते. बऱ्याच प्रकरणात तर त्यांना वैयक्तिक रोषालाही सामोरे जावे लागते. तरीही ही जबाबदारी ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शासनाच्या लेखी त्यांचे कार्य अतिशय थिटे मानले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर योजना सुरू करताना शासनाने समितीच्या अध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. या कार्याचे मानधन त्यांना केवळ एक हजार रुपये वार्षिक जाहीर करण्यात आले. तरीही समित्यांचे अध्यक्ष जादा अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी पार पाडत आहे. मात्र आज वाढती महागाई लक्षात घेता त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. गावातील अवैध धंदे नियंत्रणात आणण्याची जबाबदारी पार पाडताना त्यांना मोठी जोखिम स्वीकारावी लागते. गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठीही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सरपंच, पोलीस पाटील यांच्याशी सुसंवाद साधून कुठलेही प्रकरण पोलिसात जावू नये, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होते. मात्र त्यांचे मानधन वाढविण्याविषयी सकारात्मक विचार केला जात नसल्याचे दिसून येते. एवढेच नव्हेतर मानधनाची रक्कम ग्रामसेवकाच्या खात्यात जमा केली जावून अर्ज सादर केल्यानंतर वर्षातून एकदा ही रक्कम अध्यक्षाला मिळते.