शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ जनआंदोलन समितीचा जनहिताच्या प्रश्नांवर मेळावा

By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST

शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट

यवतमाळ : शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट भरण्याचा व्यवसाय काही समाजसेवकांनी सुरू केला आहे. मात्र आपण जनहिताचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय ५ आॅक्टोबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.केंद्रात भाजपाचे सरकार आल्यास सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा, कापूस, सोयाबीन व धानाला देण्याचे, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणूक काळात देण्यात आले. मात्र या मागण्यांचा भाजपाला विसर पडला असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात अन्न व निवारा, टोलमुक्त महाराष्ट्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कापूस-सोयाबीन-धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार वृद्ध-निराधारांना अनुदान आदी बाबींचा समावेश करणाऱ्यांना पाठिंब्याचा ५ आॅक्टोबरच्या निर्धार मेळाव्यात निर्णय घेतला जाईल, असे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)