शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरेनगरात विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पती व सासरच्या मंडळींकडून त्रास होता.

ठळक मुद्देपतीसह दोघांना अटक : नातेवाईक धडकले शहर ठाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील चांदोरेनगरातील रेणुका गृहनिर्माण सोसायटीत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या विवाहितेला तिचा पती व सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या भावाने केली. आरोपींच्या अटकेसाठी विवाहितेचे नातेवाईक शहर ठाण्यावर धडकले होते.काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पती व सासरच्या मंडळींकडून त्रास होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असावी असा आरोप तिचा भाऊ जगदीश अरुण काळे रा. नेरनबाबपूर याने केला आहे. पती व सासरच्या मंडळींनी बहिणीचा खून केला अशी तक्रार घेऊन काळे कुटुंबीय शहर पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांंनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंवि ४९८ व ३०४ अ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच पतीसह दोघांना ताब्यात घेतले.शहर ठाण्यात आलेल्या संतप्त काळे कुटुंबियांशी एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांनी चर्चा केली. कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच काळे कुटुंबीय तेथून गावाकडे परतले.पहिली दिवाळीच ठरली अखेरचीनेर येथील काळे कुटुंबियांनी खासगी सुरक्षा रक्षक असलेल्या विशालसोबत मुलीचा विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही दिवस सर्व सुरळीत होते. लग्नाला जेमतेम चार महिने झाले. लग्नानंतरची पहिल्या दिवाळी साजरी करण्यासाठी काजल माहेरी नेर येथे गेली. तेव्हा सासरच्या मंडळींनी तिला रविवारी परत बोलाविले. तेथून तीन दिवसातच आत्महत्येसारखा प्रकार घडला. यात घातपाताचा संशयही काजलच्या भावाने व्यक्त केला आहे. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. काजलची पहिलीच दिवाळी अखेरची ठरल्याचे सांगत तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

टॅग्स :Deathमृत्यू