शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव शहरात होतेय महिलांची कुचंबणा

By admin | Updated: May 28, 2016 02:26 IST

येथील बसस्थानक चौक व मार्डी चौकातील प्रवासी निवारा परिसरात महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : बसस्थानकही उपेक्षितमारेगाव : येथील बसस्थानक चौक व मार्डी चौकातील प्रवासी निवारा परिसरात महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. याकडे मात्र प्रशासनाला लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून येते.मारेगाव शहराला आता नुकताच नगरपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र तरीही शहराचा विकास अद्याप पाहिजे तसा झालाच नाही. या लहानशा शहरात महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह नाही़ त्यामुळे शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह महिला प्रवासी आणि कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी शहरात कुठेही प्रसाधन गृह उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होते. लघुशंकेसाठी कुठे जावे, असा प्रश्न त्यांना पडतो. वणी-यवतमाळ मार्गावर बस थांबा आहे़ या थांब्याजवळ दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असते. त्यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतो. मात्र बस थांब्यानजिक त्यांच्यासाठी प्रसाधन गृहाची सुविधाच नाही. परिणामी बसची वाट बघणाऱ्या महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच परिस्थिती शहरातील मार्डी थांब्यावरही आहे. तेथे प्रवासी निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु त्यात महिलांसाठी प्रसाधन गृहाची व्यवस्थाच करण्यात आली नाही. त्यामुळे या थांब्यानजिक गावाकडे जाण्यासाठी बसची वाट बघणाऱ्या महिलांची कुचंबणा होते. शहरातील विविध बँक, तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. या कार्यालयात दररोज ये-जा करणाऱ्या महिलांनाही असुविधांचा सामना करावा लागतो. (शहर प्रतिनिधी)