शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली

By admin | Updated: March 1, 2015 02:06 IST

दिग्रस शहरात शनिवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली.

यवतमाळ : दिग्रस शहरात शनिवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. वाऱ्याच्या वेगाने अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली. त्यामुळे घरे उघडी झाली. तसेच पाऊस कोसळल्याने घरातील अन्न धान्य, कपडे लत्ते ओले झाले. शहरातील होलटेकपुरा, शनिमंदिर चौक आदी परिसरात मोठे नुकसान झाले. राजाभाऊ निलावार यांच्या शनिमंदिर चौकातील घरावरील टिनाची कैचीपूर्णपणे उडून एका झाडावर अडकली. देवनगर परिसरात नारायण चिरडे यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. टिनपत्र्यावरील दगड घरात कोसळले. मात्र सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नाही. जुना बैलबाजार परिसरातील रमेश ठाकूर यांचे टीनपत्र्याचे घर पूर्णत: झोपले. यासह तालुक्यातील विठोली, कांदळी, तुपटाकळी, वरंदळी, लिंबा आदी भागात प्रचंड नुकसान झाले. बाभूळगाव तालुक्यात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा यावली, आलेगाव, पहूर, दाभा, आसेगाव, गळव्ही, चिखली आदी गावांना बसला. या गावातील अनेकांच्या घरावरून टीनपत्रे उडून गेली. बाभूळगाव येथील जिनिंगमध्ये असलेला कापूस पावसामुळे ओला झाला. सरूळ परिसरातील केळी, संत्रा आणि गहू पिकाला पावसाचा फटका बसला आहे. दाभा येथील ९५ टक्के घरावरील टीनपत्रे उडाली. २०० वर्ष जुना वृक्ष मातामायच्या मंदिरावर कोसळल्याने मंदिर उद्ध्वस्त झाले. दाभा येथे १५ मिनिट वादळी पाऊस आणि गारांचा वर्षाव सुरू होता. नेर तालुक्यातील सोनखासला वादळाचा चांगलाच तडाखा बसला. सोनखास येथील ५० घरावरील टीनपत्रे उडून गेली. पुरुषोत्तम पारधी यांच्या घरावर वृक्ष कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच यवतमाळ-अमरावती राज्य मार्गावर मोठमोठ्ठाले वृक्ष कोसळून पडल्याने अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. दारव्हा तालुक्यालाही वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. ४ वाजताच्या सुमारास एक तास पाऊस कोसळला. घाटंजी तालुक्यात दुपारी ६ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या वादळी पावसाने वृक्ष विजेच्या तारावर कोसळले. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. (लोकमत चमू)