शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अजब कारभार

By admin | Updated: March 11, 2015 01:59 IST

महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात ...

वणी : महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात आल्याने बहुतांश वीज ग्राहकांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे. दर महिन्याला महावितरणतर्फे ग्राहकांना वीज देयक पाठविण्यात येते. त्यात देयक भरण्याची अंतिम तारीख दिलेली असते. ही अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर किमान चार दिवसानंतर दंड आकारून वाढीव देयक भरण्याची मुभा दिली जाते. त्या तारखेनंतरही ग्राहकांनी देयक न भरल्यास त्यांना पुन्हा जादा भुर्दंड देऊन देयक भरण्याची मुभा दिली जाते. प्रथम १0 ते ३0 रूपये आणि नंतर चक्क १00 ते १५0 रूपयांपर्यंत भुर्दंड सहन करून ग्राहकांना वीज देयक भरता येते. फेब्रुवारी महिन्याचे वीज देयक आज मंगळवारी बहुतांश ग्राहकांच्या हाती पडले. या देयकात ९ मार्चपर्यंत देयक भरण्याची तारीख देण्यात आली. मात्र हे देयक आज १0 मार्चला ग्राहकांना वाटप करण्यात आले आहे. ९ मार्चपर्यंत ठरावीक रक्कम होती. त्यानंतर आता ग्राहकांना वाढीव रकमेसह हे देयक भरावे लागणार आहे. यात ग्राहकांची कोणतीही चूक नाही. महावितरणनेच त्यांना एक दिवस उशिरा देयक वाटप केले आहे. मात्र त्याचा नाहक भुर्दंड आता ग्राहकांवर बसणार आहे. यातून महावितरणला लाखो रूपयांचा लाभ होणार आहे. मंगळवारी १0 मार्चला वाटप करण्यात आलेल्या देयकांवर अंतिम तारीख ९ मार्च दर्शविण्यात आली. त्यानंतर १३ मार्चपर्यंत ग्राहकांना वाढीव रकमेसह देयक भरता येणार आहे. सोबतच १३ मार्च उलटून गेल्यानंतरही पुन्हा वाढीव रकमेसह ग्राहकांना देयक भरता येणार आहे. ही बाब जरी खरी असली, तरी यात ग्राहकच भरडले जात आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे देयक मिळताच महावितरणचे कर्मचारी ते भरण्यासाठी तगादा लावतात. विहित तारखेपर्यंत देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याची धमकी दिली जाते. बहुतांश महिन्यात असाच प्रकार सुरू आहे. त्याचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. त्यासाठी आता महावितरणतर्फे देयक आॅनलाईन झाल्याचे सांगून चक्क ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांना कुचकामी ठरत आहे. त्यांच्याकडे इंटरनेटच नाही. त्यामुळे आनलाईन देयक भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्याकडे इंटनरनेट आहेत, असेही बहुतांश ग्राहक या पद्धतीचा वापर करीतच नाही. मात्र महातिवरणला यातून दरमहा लाखोंचा मलिदा सहज मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)