शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वणी बाजार समितीला ४२ लाखांचा तोटा

By admin | Updated: June 15, 2014 23:47 IST

येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी

वणी : येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी नसल्याने नवनियुक्त प्रशासकीय मंडळ या बुडत्या जहाजाला कसे तारतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात आहे़ वणीत खासगी बाजार समितीला परवानगी देण्यात आल्याने शासकीय बाजार समितीवर अवकळा आली आहे. या समितीचा आर्थिक स्त्रोत घटला आहे. शेतकरी, व्यापारी, दलाल सर्वांनीच या समितीकडे पाठ फिरविली. परिणामी ही शासकीय बाजार समिती केवळ धान्य बाजाराचा ‘सेस’ व गोडाऊन भाडे यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आपला गाडा हाकलत आहे. या समितीला पूर्णवेळ सचिव मिळाल्याने त्यांनी उत्पन्न वाढीसाठी धडपड सुरू केली. तथापि कायद्यातील बगलवाटांसमोर ते हतबल झाले आहे. या बाजार समिती संचालकांचा कार्यकाळ संपल्याने शासनाने त्यांना मुदतवाढ न देता प्रथम प्रशासक नेमला़ या प्रशासकाला बाजार समितीची गाडी रूळावर आणता आलीच नाही़ अखेर आपल्या रिकाम्या कार्यकर्त्यांना हक्काची खुर्ची मिळावी म्हणून आमदार वामनराव कासावार यांनी शिफारस करून आपल्या कार्यकर्त्यांचे १७ सदस्यीय प्रशासक मंडळ समितीवर बसविले़ यापूर्वीचे संचालक मंडळही काँग्रेसचेच होते़ मात्र ते आमदारांच्या विरोधी गटातील होते़ त्यामुळे जुन्या संचालक मंडळातील कुणालाच नवीन प्रशासकीय मंडळात संधी मिळाली नाही़ नवे प्रशासकीय संचालक मंडळ आगामी विधानसभा निवडणुकीत आधार देईल, असा आमदारांचा कयास असावा़ यावर्षी बाजार समितीला ८३ लाख ९३ हजार १६० रूपयांचे उत्पन्न झाले़ कर्मचारी वेतन, इलेक्ट्रीक देयक, टेलिफोन देयक, विविध कर, या आवश्यक खर्चासह ईतर खर्च मिळून एक कोटी २६ लाख १७ हजार ४९९ रूपये खर्च झाला. मात्र त्या मानाने उत्पन्न कमी झाले. उत्पन्न कमी अन् खर्च जादा, अशी बाजार समितीची गत झाली आहे. समितीचा गाडा हाकताना मंडळाच्या नाकीनऊ येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)