शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा बायपास परिसर जलमय

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ

यवतमाळ : वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ मार्ग काढणे कठीण झाले आहे. शिवाय या परिसरात विजेचाही लपंडाव सुरू आहे. लोहारा-वाघापूर मार्गावर असलेले मैथिलीनगर, राऊतनगर, अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधलेल्या नाही. पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहत जाते. गेली दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. अनेक घरे पाण्याखाली आली आहे. संपूर्ण घराला विळखा पडला आहे. या भागामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण झाले, काही ठिकाणी खडीकरणही करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रमुख रस्त्यावरील खोलगट भागातून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते. त्यात सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. यापासून धोका निर्माण झाला आहे. घरासमोरील रस्त्यावरून वाहणारे पाणी कित्येक दिवसपर्यंत थांबत नाही. ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी मुरूम टाकलेले रस्तेही आता चिखलमय झालेले आहे. आता त्यातून मार्ग काढण्याचा प्रश्न या भागातील हजारो नागरिकांपुढे आहे. काही दिवसांपूर्वी अहल्यानगरीत सिमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी मुख्य नाल्याला जोडण्यापर्यंत काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील नव्यानेच तयार झालेल्या डांबरी रस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नागरिकांच्या घरापर्यंत दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. नालीचे बांधकाम करताना पाईप टाकण्यात आलेले नाहीत. शिवाय कामही अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या अंगणात शिरत आहे. मैथिलीनगरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी मुख्य नाल्यापर्यंत काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने गेली अनेक वर्षांपासून दाखविलेले नाही. या भागातील सर्व पाणी अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागात शिरत आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहात असल्याने मार्ग काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या भागात गेली काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तास-अर्धा तासाने वीज पुरवठा खंडित होत आहे. या मागील नेमके कारण शोधण्याचे सौजन्य विद्युत कंपनीकडून दाखविले जात नाही. या भागात असलेल्या रोहित्रांच्या पेट्यांची दारेही बेपत्ता आहेत. त्यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दिवसाही पथदिवे सुरू राहण्याचा आजार या भागाला जडला आहे. दुसरीकडे अनेक खांबांवरील दिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. वारंवार सांगितल्यानंतरही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. सदर भाग लोहारा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.५ मध्ये येतो. या ग्रामपंचायतीच्या सरपंचही याच प्रभागातून निवडून आलेल्या आहेत. शिवाय दोन सदस्यही आहे. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)