शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

२४ वर्षे फरार आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: May 31, 2017 00:32 IST

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सासऱ्याने साडभावाला शेती घेऊन दिल्याच्या रागातून आरोपीने जून १९९२ मध्ये साडभावाचा

साडभावाचा खून : डोंगरखर्डात १९९२ ची घटना, २०१६ ला अटक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सासऱ्याने साडभावाला शेती घेऊन दिल्याच्या रागातून आरोपीने जून १९९२ मध्ये साडभावाचा शेतातच खून केला होता. यानंतर आरोपी तब्बल २४ वर्षे फरार होता. जिल्हा न्यायालयाने त्याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सुभाष श्रीधर राणे (५५) रा. भीमनगर वर्धा, असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डोंगरखर्डा येथे गणेश विश्वेश्वर डोहीये (३५) यांनी २० एकर शेत जमीन खरेदी केली होती. डोहीये परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. आरोपी सुभाष राणे हा डोहीये यांचा सख्खा साडभाऊ आहे. त्याने या शेतीवरून गणेश डोहीये यांना जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. ही शेती त्यांना सासऱ्यानेच घेऊन दिली, असा त्याचा समज होता. अखेर २४ जून १९९२ रोजी दुपारी २ वाजता डोहीये डोंगरखर्डा शेतशिवारात असताना आरोपी राणे याने त्यांच्यावर हल्ला केला. गुप्तीने छातीत व पोटावर वार केले. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गणेश डोहीये यांच्या मृत्यूपूर्व जबानीवरून कळंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरूण झलकारिया यांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र आरोपी सुभाष राणे पसार असल्याने न्यायालयात दोषारोपपत्र सादर करता आले नाही. शेवटी पोलीस उपनिरीक्षक रमेश मगर यांनी त्याला २०१६ मध्ये अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी या खटल्यात तब्बल १२ साक्षीदार तपासले. यात मृतकाची पत्नी अल्का, दोन प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ए.एस. देशमुख व अ‍ॅड़ संदीप दर्डा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार दत्तात्रय मेश्राम यांनी त्यांना सहकार्य केले.