शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे नेतृत्त्व पुन्हा पराभुताकडेच !

By admin | Updated: November 6, 2014 23:02 IST

ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे.

यवतमाळ : ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे. या पराभूत नेत्याच्या नेतृत्त्वात पुन्हा काँग्रेसच्या नव्या टीमची जुळवाजुळव केली जात आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन मंत्री पराभूत झाले. त्यावेळी वामनराव कासावार हे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर राजीनाम नाट्य रंगले. त्यातून वामनरावांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाला जीवदान मिळविले. वामनरावांच्याच नेतृत्त्वात काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली. जिल्हाध्यक्ष स्वत: वणी विधानसभेच्या आखाड्यात उतरल्याने त्यांना पक्षाच्या अन्य उमेदवारांसाठी काहीही योगदान देता आले नाही. निवडणूक काळात काँग्रेसची कार्यकारिणीही अस्तित्वात नव्हती. केवळ जिल्हाध्यक्ष होते. तेही स्वत:च्या निवडणुकीत गुंतले होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा कार्यकारिणीशिवाय काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. त्यामुळे व्हायचे तेच झाले. काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड हा काँग्रेसचा गड भाजपमय झाला. नवख्या उमेदवारांनी काँग्रेसच्या दीर्घ अनुभवी नेत्यांना पराभवाची धूळ चारली. काँग्रेसचे नेते आता मोदी लाटेआड स्वत:चा पराभव लपवित असले तरी या निवडणुकीने काँग्रेस व कार्यकर्ते, काँग्रेस व मतदार यांच्यात वाढलेली दरी अधोरेखित केली. विधानसभेतील पराभवाचे चिंतन करण्याची गरज अद्याप जिल्ह्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला वाटलेली नाही. उलट प्रमुख नेत्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्षाकडेच पद कसे कायम राहील, यासाठी पुन्हा प्रयत्न चालविले आहे. पुन्हा जिल्हा काँग्रेसची वाटचाल पराभूताच्या नेतृत्त्वातच होण्याची चिन्हे आहेत. वास्तविक नव्या दमाच्या तरुणाकडे जिल्हा काँग्रेसची धुरा सोपविणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा कार्यकारिणीत कुणाला घ्यावे, यासाठी प्रमुख पराभूत उमेदवारांची छुपी बैठक पार पडली. यावरून नव्या कार्यकारिणीत पुन्हा जुने चेहरे दिसणार हे स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)