लॅबमधील तपासणी अहवाल संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:33+5:30

आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील काही ठिकाणी होत असलेल्या चाचण्यांविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारही योग्य होण्याविषयी साशंकता आहे.

Lab test report suspicious | लॅबमधील तपासणी अहवाल संशयास्पद

लॅबमधील तपासणी अहवाल संशयास्पद

ठळक मुद्देमधूमेह रुग्णात भीती : तीन ठिकाणच्या चाचणीत फरक

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : एकाच व्यक्तीचे लॅबमधील तपासणी अहवाल वेगवेगळे येत असल्याचा प्रकार येथे घडत आहे. त्यामुळे चाचणीविषयी शंका व्यक्त केली जात आहे. रुग्णांना मात्र मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील काही ठिकाणी होत असलेल्या चाचण्यांविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारही योग्य होण्याविषयी साशंकता आहे.
येथील एका व्यक्तीने तीन ठिकाणी मधूमेहाची चाचणी केली. या तीन ठिकाणचा अहवाल वेगवेगळा आला. नेमका खरा अहवाल कुणाचा याविषयी त्यांच्याही मनात शंका आली. काही ठिकाणी गंभीर, तर काही ठिकाणी साधारण मधूमेहाची लक्षणे असल्याचा अहवाल देण्यात आला. नेमका हा प्रकार काय असावा, या बाबीने ते गोंधळून गेले आहे. दुसरीकडे वारंवार तपासण्या कराव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. लॅबमध्ये अव्वाच्या सव्वा रक्कम तपासणीसाठी आकारली जाते. यावर कुणाचेही बंधन नाही. जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

वेगवेगळ्या ठिकाणच्या लॅबमध्ये झालेल्या चाचणीत तफावत वाटत असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. चौकशी करून कारवाई केली जाईल.
- डॉ. रवींद्र दुर्गे,
आरोग्य अधिकारी, नेर

Web Title: Lab test report suspicious

टॅग्स :Healthआरोग्य