शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर रसशोषक किडींचे आक्रमण

By admin | Updated: September 12, 2016 01:42 IST

तालुक्यातील कपाशीचे पीक ऐन बहाराच्या अवस्थेत असतानाच पिकांवर सध्या रसशोषक किडींचा अचानक प्रादुर्भाव वाढल्याने कपाशीचे पीक आकसल्यासारखे झाले आहे.

शेतकरी धास्तावले : फवारणीसाठी महागड्या कीटकनाशकांचा करावा लागतो वापरदारव्हा : तालुक्यातील कपाशीचे पीक ऐन बहाराच्या अवस्थेत असतानाच पिकांवर सध्या रसशोषक किडींचा अचानक प्रादुर्भाव वाढल्याने कपाशीचे पीक आकसल्यासारखे झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात सतत बदल होत आहे. वातावरणातील या बदलामुळे कापूस पिकातील पात्या व फुलगळ वाढली आहे. रसशोषक किडींच्या अगमानामुळे शेतकरी धास्तावला आहे. कीड नियंत्रणासाठी महागड्या किटकनाशकांचा वापर शेतकरी वर्ग सर्रास करताना दिसून येत आहे. रसशोषक किडींमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, पिठ्या ढेकुन, कोळी या किडींचा समावेश होत आहे. सध्या तालुक्यात कापूस पिकांवर प्रामुख्याने फुलकिडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे. इतर रसशोषक किडींचेही प्रमाण आढळत आहे. या किडी मुख्यत: पानाच्या खालच्या बाजुस राहून रसशोषण करीत असतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. याशिवाय या किडींचा प्रादुर्भाव झाडाचे कोवळे शेंडे, फुले व फळांवरसुद्धा आढळून येतो. काही रसशोषक किडी आपल्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर कॅप्नोडियम नावाची काळी बुरशी वाढते व त्याचा झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊन पिकांचे उत्पादन व प्रत घटते. दारव्हा तालुक्यात ३० हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात रसशोषक किडींचे आक्रमण झाले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध किडकनाशकांचा विशेषत: महागड्या किटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. खासगी कंपन्यांचे कर्मचारी, कृषी केंद्रांच्या माध्यमातून गावोगावी आपल्या उत्पादनांचा प्रचार करीत आहेत. (प्रतिनिधी)