शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आयव्हीआरसीएलकडे ४९ लाख थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

या कंपनीने नगरपरिषदेचा विकास शुल्क व राज्य शासनाचा कामगार उपकर तसेच पालिकेच्या इतर कराचा सन २०११-१२ पासून भरणाच केला नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी तक्रार केली होती. परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या या टोलनाक्यावर गेल्या नऊ वर्षांपासून वाहनांकडून टोलवसुली केली जात आहे.

ठळक मुद्देपालिकेचे बांधकाम विभागाला पत्र : परवानगी न घेताच केले टोलनाक्याचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रस्ता बांधकाम करणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीकडे वणी नगरपालिकेचे तब्बल ४९ लाख ३९ हजार १७४ रूपये करापोटी थकीत आहेत. त्याची वसुली करण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही कंपनीने कराचा भरणा केला नाही.गंभीर बाब ही की, या कंपनीने नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता वणी-घुग्घूस मार्गावर टोलनाका उभारला. त्यामुळे वणी नगरपालिकेत या टोलनाक्याची कोणतीही नोंद नाही. या कंपनीने नगरपरिषदेचा विकास शुल्क व राज्य शासनाचा कामगार उपकर तसेच पालिकेच्या इतर कराचा सन २०११-१२ पासून भरणाच केला नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी तक्रार केली होती. परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या या टोलनाक्यावर गेल्या नऊ वर्षांपासून वाहनांकडून टोलवसुली केली जात आहे.विशेष म्हणजे वणी एमआयडीसी परिसर हा नगरपालिकेच्या हद्दीत येत असतानाही या टोलनाक्यावरून एमआयडीसीत जाणाऱ्या वाहनांकडूनही कर वसुली केली जात असल्याचे पी.के.टोंगे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या सूचनेवरून वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी अलिकडेच पांढरकवडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहीले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४ अन्वये बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र आयव्हीआरसीएल कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.सन २०११-१२ पासून टोलनाक्यावरून वसुली सुरू करण्यात आल्याने आयव्हीआरसीएल या कंपनीला ४९ लाख ३९ हजार १७४ रूपये नगरपालिकेत भरणे आवश्यक आहे. या कंपनीने जवळपास एक हजार २३५.१६ चौरस मिटरवर टोलनाक्याचे बांधकाम केले आहे. मागील काही वर्षापासून सातत्याने पालिकेकडून कराबाबत या कंपनीला अवगत करण्यात आले होते.

टॅग्स :tollplazaटोलनाका