शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील दहा लाखांवरील व्यवहाराची होणार चौकशी

By admin | Updated: October 24, 2016 01:01 IST

विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी दाखल झाल्यापासून संपूर्ण

आदर्श आचारसंहिता : विधान परिषद निवडणुकीत घडामोडींवर आयोगाचे लक्षयवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी दाखल झाल्यापासून संपूर्ण घडामोडींवर आयोगाचे लक्ष राहणार आहे. याबाबत माहिती, तक्रारी करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. विधान परिषद निवडणुकीत ४४० मतदार आहे. या निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. पैसा, जात, धर्माच्या प्रभावातून त्यांना मतदानासाठी बाध्य केले जाऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये एक महिन्याच्या कालावधीत दहा लाखांच्यावर आर्थिक उलाढाल झाल्यास त्याची चौकशी केली जाईल. यासाठी लिड बँक व्यवस्थापक आणि आयकर विभागाची मदत घेतली जाईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. निवडणुकीदरम्यान उमेदवार अथवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे अनधिकृत रोख आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय पोलिसांच्या तपासणी चौकींच्या माध्यमातून संशयितांची झाडाझडती घेतली जाईल. सरसकट तपासणी केली जात नसली, तरी संशय आलेल्या व्यक्तीला तपासण्यात येईल. ही निवडणूक प्रलोभनाशिवाय पार पडावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. प्रत्येक उमेदवारासोबत पथक राहील. शिवाय गोपनीय यंत्रणेचाही उमेदवार व त्यांच्या निकटवर्तीयांवर वॉच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनी निर्भीडपणे आणि विवेकाने मतदान करावे. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. संभावित उमेदवारांच्या हालचालींवर आत्ताापासूनच पाळत ठेवली जात आहे. यासंदर्भातील कुठलीही माहिती गोपनीय पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचावी, त्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवली जातील, असे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी सांगितले. नगरपरिषद आणि विधान परिषद निवडणूक काळात दारू विक्रीचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल. विक्रीत अतिरिक्त वाढ झाल्यास त्याची विचारणा संबंधित परवानाधारकाला करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, आयकर विभागाचे राहुल दीडपाये उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)