शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने

दारव्हा : मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.२८ आॅगस्टपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गत चार दिवसातच २०४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ८४४ मि.मी. पावसाची आहे. सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. सतत चार दिवस कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील विशेषत: खोलगट भागामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने त्या ठिकाणचे कपाशीची झाडे मलूल होत आहेत. कपाशीच्या झाडाचे बारीक तंतूमय मुळांचे जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे त्या झाडांची अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रीया मंदावते. त्यामुळे झाडे मर सदृश रोगाने ग्रासल्या जात आहेत. यासंदर्भात दारव्हा तालुका कृषी अधिकारी अंगाईत यांच्याशी संपर्क साधला असता, मलूल झालेले अथवा होत असताना कॉपर आॅक्सीक्लोराईड या बुरशीनाशकाची २५ ते ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून सोबत १०० ग्रॅम युरिया टाकावा व हे द्रावण स्प्रे पंपाने नोझल काढून बाधित झाडांच्या मुळांच्या सभोवताल १०० मि.ली.पर्यंत प्रती झाड टाकावे. शक्य असल्यास फवारणी करावी तसेच मलूल झालेल्या झाडांच्या बुंध्याजवळ पायाने दाबावे त्यामुळे बारीक मुळांची पुन: जमिनीशी संपर्क होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. पॅराविल्ट हा रोग भौतिक अवस्था व बुरशीमुळे होत असून शेतकऱ्यांनी लक्षणे दिसताच त्वरित सावधानता बाळगून योग्य उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)