शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: October 1, 2015 02:27 IST

वनपरिक्षेत्राच्या पिरंजी बीटमध्ये उघडकीस आलेल्या २० लाख रुपयांच्या सागवान कत्तलीचा अहवाल मुख्य वनसंरक्षकांनी तातडीने मागविला ..

अहवाल सादर होणार : उमरखेड वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोड
उमरखेड : वनपरिक्षेत्राच्या पिरंजी बीटमध्ये उघडकीस आलेल्या २० लाख रुपयांच्या सागवान कत्तलीचा अहवाल मुख्य वनसंरक्षकांनी तातडीने मागविला असून हा अहवाल प्राप्त होताच दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. त्यामुळे उमरखेड वन अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णापूर जंगलात २५० पेक्षा अधिक वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली होती. कृष्णापूर बीटमध्ये कक्ष ४६५, ४६६ तर पार्डी बीट कक्ष क्र.४५४, ४५६ मध्ये वृक्षतोड झाली आहे. कृष्णापूरमधील या सागवानाची किमत सुमारे २० लाख रुपये सांगितली जाते. ही वृक्षतोड दडपण्याचे प्रयत्न टॉप टू बॉटम सुरू आहे. तसेच डमी आरोपी दाखविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. जप्तीत दाखविण्याचे व कारवाई केल्याचे भासविले जात आहे. या प्रकरणात वनरक्षक सी.व्ही. जाधव यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. ही कारवाई जोरात सुरू असल्याने वन अधिकाऱ्याकडून दाखविले गेले. परंतु सदर प्रकरणाची गंभीर दखल वनमंत्रालयाकडून घेतली गेली. त्यामुळे चौकशीला गती आली. यवतमाळ दक्षता विभागाचे केशव वाभळे व पुसद येथील भरारी पथक प्रमुख के.पी. धुमाळे, पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धामगे यांनी जंगलात सखोल चौकशी केली. जवळपास पाच दिवस जंगल पिंजून काढले. २८ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास तीन तास उमरखेड उपविभागीय वन कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी पिरंजी बीटमधील सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्याचबरोबर या प्रकरणात निलंबित वनरक्षक जाधव यालाही यावेळी सदर प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आले.
या प्रकरणात काही वन अधिकाऱ्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच निलंबित वनरक्षक जाधव यांच्याकडून काही लिहून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जाधव यांनी लेखी देण्यास नकार दिल्याचे समजते. तसे लिहून घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकला गेल्याची वनवर्तुळात चर्चा आहे. परंतु सर्व अधिकाऱ्यांचे ऐकून घेतल्यानंतर कुठल्याही कागदावर स्वाक्षरी करायला व लेखी देण्यास निलंबित वनरक्षक जाधव यांनी स्पष्ट नकार दिल्याचे समजते. यावरून आजही पिरंजीप्रकरणात अधिकाऱ्यांना वाचविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असल्याचे समजते. आता पिरंजी जंगलातील सागवान प्रकरणाचा अहवाल मुख्य वनसंरक्षकाकडे सादर केला जाईल. त्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)