शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नेर एसटी आगाराच्या १८ फेऱ्यांचे उत्पन्न तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने आगारातून एसटी बस बाहेर निघताना फवारणी करून निर्जंतूक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता दहा टक्केही रक्कम प्रवासी भाड्यातून मिळत नाही. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.

ठळक मुद्देप्रवासी नसल्याचा फटका : एसटी महामंडळाला डिझेल खर्चही परवडेना

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने २२ मेपासून हा निर्णय घेतला. नेर आगारातील आतापर्यंत बसच्या १८ फेºया झाल्या. यातून केवळ तीन हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे खर्च अधिक उत्पन्न कमी अशा स्थितीत बसेस चालवाव्या लागत असल्याचे दिसून येते.कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने आगारातून एसटी बस बाहेर निघताना फवारणी करून निर्जंतूक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता दहा टक्केही रक्कम प्रवासी भाड्यातून मिळत नाही. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.नेर आगारातून यवतमाळ, दारव्हा, बाभूळगाव येथे दिवसाला तीन बसफेºया सोडण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी २२ मे रोजी तीन हजार ७५२ रुपयांचे डिझेल लागले. ५५१ किलोमीटरचा प्रवास झाला व उत्पन्न आले ६६१ रुपये. दुसºया दिवशी एसटी बस २५९ किलोमीटर चालली, यात दोन हजार २७६ रुपये उत्पन्न आले. मात्र यावर १६ हजार ८८३ रुपयांचे डिझेल खर्च झाले. २४ मे रोजी १३६ किलोमीटरचा प्रवास झाला, सहा हजार ५६६ रुपयांचे डिझेल लागले व ९८० रुपये प्रवास भाडे आले. अशा स्थितीत एसटी महामंडळाला बसफेºया चालविणे प्रचंड तोट्याचे झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक दीपा वड्डे यांनी दिली.गरिबांची लालपरी सातत्याने तोट्यातआडवळणावरच्या गावखेड्यात पोहोचणारी गरिबांची लालपरी अर्थातच एसटी बस गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तोट्यात आली आहे. अनेक गावांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम एसटीच्या माध्यमातून होते. गावातील होतकरू तरुणांना रोजगारासाठी, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुका व जिल्हा मुख्यालयाला ने-आण करणारी एसटी बस ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. आता तिच अडचणीत आल्याने संकट वाढले आहे.