खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणाºया दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिने कारावासाची ...

Imprisonment for two false witnesses | खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास

खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी निर्दोष, साक्षीदार मात्र अडकले !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणाºया दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. हा निकाल गुरुवारी देण्यात आला.
अंकित कैलास मुन (२०) रा. संकटमोचन, शुभम मधुकर उईके (२३) रा. उमरसरा असे शिक्षा झालेल्या साक्षीदारांची नावे आहे. या दोघांनी जय नगरनाईक (२०) रा. जगत मंदिर उमरसरा याच्या खुनातील आरोपींना वाचविण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे निष्पन्न झाले. या खोट्या साक्षीमुळे जयच्या खुनातील आरोपी सौरभ महादेव काळे, तेजस संजय गायकवाड, उत्तम आनंदराव जाधव तिघे रा. सुभाषनगर यांची २१ डिसेंबर २०१९ रोजी निर्दोष सुटका झाली. मात्र न्यायालयात साक्षीदारांनी खोटी साक्ष दिल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी साक्षीदार अंकित मुन, शुभम उईके यांना न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ प्रमाणे नोटीस बजावली व त्यांच्याकडून लेखी जबाब मागितला. साक्षीदारांनी दिलेला लेखी जबाब व न्यायालयात दिलेली साक्ष याची पडताळणी करण्यात आली. काही परिस्थितीजन्य पुरावेही पुढे आले. यामध्ये साक्षीदार खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा खटला सुरू करण्यात आला. न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचा गुन्हा सिद्ध झाला. यावरून जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी या साक्षीदारांना दोन महिने कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सात दिवस कारावासाची शिक्षा आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Imprisonment for two false witnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.