शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा घाटात गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By admin | Updated: May 14, 2016 02:23 IST

येथील वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे.

रस्त्यालगत मोठ्ठाले खड्डे : अपघाताची टांगती तलवार प्रकाश लामणे पुसद येथील वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. राज्य मार्गालगतच मोठ्ठाले खड्डे खोदले जात असल्याने अपघाताची टांगती तलवार कायम असते. वन विभागाच्या हद्दीतून वारेमाप गौण खनिज चोरले जात असले तरी कारवाई मात्र केली जात नाही. पुसद तालुक्यात वन आणि महसूल विभागाच्या हद्दीत गौण खनिजाची चोरी नवीन बाब नाही. बांधकामासाठी मुरुम, वीटभट्टीसाठी लालमाती आणि गिट्टीसाठी दगडांची चोरी केली जात आहे. राजरोसपणे मोठ्ठाले खड्डे खोदून ट्रक-ट्रॅक्टरच्या द्वारे वाहतूक केली जाते. पुसद-वाशिम मार्गावर असलेल्या खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जात आहे. वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी मोठ्ठाले खड्डे खोदण्यात येत आहे. पुसद शहर व तालुक्यातील इतर ठिकाणच्या वीटभट्ट्यांसाठी येथून लालमाती चोरीस जात आहे. तर बांधकामासाठी मुरुमही मोठ्या प्रमाणात उत्खनन केला जातो. सर्व नियमांना बगल देऊन होत असलेल्या उत्खननाने घाटात मोठ्ठाले खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे या भागातील मोठ्याल्या वृक्षांचे मूळ उघडे पडले आहे. साध्या वाऱ्यातही वृक्ष कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य मार्गालगत होत असलेल्या या उत्खननाचा फटका रस्त्यालाही बसत आहे. अगदी रस्त्यालगतच मोठमोेठ्ठाले खड्डे खोदून ठेवले आहे. यामुळे वाहनांना अपघाताची भीती असून वाहनाला अपघात झाल्यास या खड्ड्यांमुळे थेट दरीत कोसळू शकते. वन विभागाचे कर्मचारी या परिसरात तैनात असले तरी गौण खनिज तस्करांवर कारवाई केली जात नाही. एखाद वेळेस कारवाई केलीच तर केवळ दंड ठोकून त्यांना सोडून दिले जाते. यामुळेच तालुक्यातील गौण खनिज तस्करांचे मनोबल वाढले आहे. ट्रक-ट्रॅक्टर द्वारे भर दिवसाही वाहतूक केली जाते. गौण खनिजाआड सागवान तस्करी होत असल्याची माहिती आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. खंडाळा घाटात सहज फेरफटका मारला तरी मोठ्ठाले खड्डे दिसून येतात. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसू नये याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.