कोरोनात समस्या दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:39+5:30

कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली आहे. गेल्या ५० दिवसांपासून हा लढा सुरु आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व प्रमुख समस्या दुर्लक्षित ठरल्या आहे. तालुक्याच्या माळपठार परिसरातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईसुद्घा दुर्लक्षित आहे. याशिवाय शहर व तालुक्यातील रस्त्यांकडेही सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

Ignored the problem in Corona | कोरोनात समस्या दुर्लक्षित

कोरोनात समस्या दुर्लक्षित

ठळक मुद्देपुसद तालुका : पाणीटंचाई कायमच, रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या ५० दिवसांपासून शासन, प्रशासन आणि नागरिक कोरोनाविरुद्घ लढा देत आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व समस्या दुर्लक्षित झाल्या आहे. पाणी टंचाईसह रस्ते दुरुस्ती आणि इतर समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली आहे. गेल्या ५० दिवसांपासून हा लढा सुरु आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व प्रमुख समस्या दुर्लक्षित ठरल्या आहे. तालुक्याच्या माळपठार परिसरातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईसुद्घा दुर्लक्षित आहे. याशिवाय शहर व तालुक्यातील रस्त्यांकडेही सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

संचारबंदीमुळे रस्त्यांवरील वर्दळ रोडावली
संचारबंदीमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडे कुणाचेच लक्ष नाही. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने खड्डे बुजविण्याकडेही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय शहर व तालुक्यातील इतर समस्याही दुर्लक्षित झाल्या आहे.

Web Title: Ignored the problem in Corona