शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेली मजुरी दिलीच नाही

By admin | Updated: August 24, 2014 00:16 IST

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत उत्तरवाढोणा बीटमध्ये ४० हजार हेक्टरवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी उत्तरवाढोणा, सोनवाढोणा येथील १०० मजुरांना कामावर लावण्यात आले.

वनविभागाचा प्रताप : २२० रुपयांवर सही घेऊन दीडशे ठेवले हातात सोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत उत्तरवाढोणा बीटमध्ये ४० हजार हेक्टरवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी उत्तरवाढोणा, सोनवाढोणा येथील १०० मजुरांना कामावर लावण्यात आले. सुरुवातीला त्यांना २२० रुपये मजुरी देण्याचे ठरले. मस्टरवर तशा सह्यासुद्धा घेण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात मात्र १५० रुपये मजुरीच त्यांच्या हातावर ठेवण्यात आली. या प्रकरणी मजुरांमध्ये रोष व्यक्त होत असून त्यांनी या संदर्भात नेर वनपरिक्षेत्रासह उपवनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मजुरीबाबत हा घोळ वन विभागाकडून उत्तरवाढोणा बीटमध्ये झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने संबंधित वनरक्षकासोबत संपर्क साधला असता मजुरांची ठराविक वेळ १० वाजताची असताना ते ११ वाजता आले म्हणून त्यांचे एक तासाचे पैसे आम्ही कापल्याचा अजब युक्तिवाद त्यांनी केला. वास्तविक शासकीय नियमात असे कुठलेही प्रावधान नाही. आधीच मजुरी कमी असताना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही. त्यातही मस्टरवर दिशाभूल करणारी माहिती लिहिली. यामुळे मजुरांमध्ये रोष व्यक्त होत आहे.याबाबत वनविभागाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मात्र दिल्या जात नाही. गोरगरीब व दारिद्र्यरेषेखालील या मजुरांना कमी मजुरी दिल्याबाबत वनविभागाविषयी रोष व्यक्त होत आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या सहा महिला मजुरांना कमी मजुरी देण्यात आली त्या गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागात सेवा देत आहेत. या प्रकरणी या सहाही बीपीएलधारक महिला मजुरांना न्याय मिळावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. उपवनसंरक्षक यांना या बाबत निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई व्हावी आणि मजुरांचे उर्वरित पैसे त्वरित देण्यात यावे, अशी मागणी विमल राऊत, कामूबाई नरोटे, फुलवंती कुमरे, सोनाबाई बनसोड, बेबीबाई मेश्राम, पार्वता लडके, निर्मला पारधी रा.सर्व उत्तरवाढोणा यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)