हॉटेल, रेस्टॉरंट उघडले पण खवैय्येच नाही फिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:29+5:30

सहा महिने व्यवसाय बंद असल्याने हॉटेल्स्मधील दहा ते पंधरा हजार कामगार शेतमजुरी व इतर कामात गुंतले होते. त्यांना हळूहळू परत बोलवायचे म्हटले तरी ग्राहकांचा कल नसल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची खंत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली.

Hotels and restaurants opened but the diners did not return | हॉटेल, रेस्टॉरंट उघडले पण खवैय्येच नाही फिरकले

हॉटेल, रेस्टॉरंट उघडले पण खवैय्येच नाही फिरकले

ठळक मुद्देसहा महिन्यानंतर घमघमाट : सायंकाळी ७ पर्यंतच ग्राहकांना एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १८ मार्चपासून कोरोनामुळे बंद असलेले हॉटेल्स्, रेस्टॉरन्ट तब्बल साडेसहा महिन्यानंतर सोमवारी उघडले. मात्र खवैय्येगिरीचा शौक असला तरी कोरोनाचा धसका घेऊन पहिल्या दिवशी ग्राहक फिरकले नाही. त्यामुळे ७५ कोटीपेक्षा जास्त तोटा सहन करून तग धरलेल्या हॉटेल व्यावसायिकांना आणखी काही दिवस कळ सोसावी लागणार आहे.
सहा महिने व्यवसाय बंद असल्याने हॉटेल्स्मधील दहा ते पंधरा हजार कामगार शेतमजुरी व इतर कामात गुंतले होते. त्यांना हळूहळू परत बोलवायचे म्हटले तरी ग्राहकांचा कल नसल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची खंत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. काही दिवस नो प्रॉफीट नो लॉस या तत्वानेच व्यवसाय सुरू ठेवण्याच्या मनस्थितीपर्यंत ते आले आहेत. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत.
 

Web Title: Hotels and restaurants opened but the diners did not return