नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:16+5:30

सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

Help for the disadvantaged farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : मागील आठ दिवसांमध्ये तालुक्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके खराब झालेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभाग व महसूल विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. याकरिता विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधित पीक विमा कंपनी व तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांमध्ये समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची महसूल विभागातर्फे प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Help for the disadvantaged farmers