शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये उसळली प्रचंड गर्दी

By admin | Updated: October 9, 2015 00:33 IST

मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांची तहसील परिसरात प्रचंड गर्दी उसळली.

शेवटचा दिवस : रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच, मारेगावात १३२, झरीत ७४ च्यावर अर्ज दाखलमारेगाव : मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांची तहसील परिसरात प्रचंड गर्दी उसळली. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तर तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.प्रथमच होणाऱ्या मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मात्र राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक दुखावले गेले असून नाराजांना सांभाळताना राष्ट्रीय पक्षांची दमछाक होत आहे. १ नोव्हेंबरला होणाऱ्या मारेगाव नगरपंचायत निवडणुकीची शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. यात काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष आघाडीवर होते. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून सर्वांनाच ‘कामाला लागा’चा संदेश देण्यात आला होता. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र पक्षांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागल्याने नाराजांची संख्या मोठी आहे. या नाराजांना सांभाळून सोबत ठेवण्याची मोठी कसरत राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना करावी लागणार आहे. आत्तापर्यंत पक्षाचे गोडवे गाणारे, हे नाराज आता उघडपणे पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहे. त्यांना जागा दाखविण्याची भाषा बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नाराजांनी ‘अभी नही, तो कभी नही’ चा नारा देत अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. आता हे अपक्षच सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे करणार असल्याने, खुल्या प्रवर्गातील लढती काट्याच्या होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान मारेगाव येथे १३५ अर्ज दाखल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)झरीतील राजकीय समीकरणे बदललीझरी : झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून येथील राजकीय समीकरणे बदललेली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील राजकीय नेत्यांनीही निवडणुकीत रूची दाखविलेली आहे. झरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथील सत्ता आपल्या ताब्यात राहिली, तर तालुक्यातील सत्तासूत्रे हलविता येतील, यासाठी काँग्रेस व भाजपासह इतरही पक्षांच्या बैठका झाल्या आहे. त्यात आपलेच उमेदवार कसे निवडून येतील, त्यासाठी कसा प्रचार करायचा, निवडणुकीची रणनिती कशी आखायची, यावर विचार करण्यात आला. ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी अटीतटीची व प्रतिष्ठेची झाली आहे. गुरूवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांसोबत दिसून येत होते. कार्यकर्ते उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्तता व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. गुरूवारी शेवटचा दिवस असल्याने, या दिवशी ७५ च्यावर अर्ज दाखल झाले. येथील मतदारांची संख्या अतिशय मर्यादित व कमी आहे. मतदार संख्येच्या तुलनेत उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे.अद्याप झरी येथील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. मात्र येथे नक्कीच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक नगराध्यक्षपदी विराजमान होईल, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अजूनही आरक्षणाबाबत उत्सुकता दिसून येत आहे. १७ जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आता निवडणूक जवळ येत असल्याने उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. मात्र मतदार अत्यंत कमी असल्याने काही प्रभागात केवळ ३0 ते ५0 मतांमध्ये उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)