शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकरी हवालदिल, सोयाबीन, कापूस, तुरीला परतीच्या पावसाचा फटका

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्याला परतीच्या पावसाने मोठा दणका दिला. यामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला असून ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी सतत १0 दहा दिवस परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. नंतर शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे कापूस, तूर जमिनदोस्त झाले. या प्रमुख पिकांना फटका बसल्याने पूर्ण हंगामाच शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. यावर्षी पिकांच्या योग्य पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला.१८ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सतत पाऊस व ढगाळी वातावरण होते. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन सवंगणी करून गंजी लावल्या. त्या पूर्णपणे पाण्यात भिजल्या. परिणामी सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटले. ते काळे पडले. हे सोयाबीन व्यापारी घ्यायला तयार नाही. यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.महसूल राज्यमंत्र्यांकडून पाहणीनुकसानग्रस्त गावांना शनिवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून पाहणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, याकरिता आपण शासनस्तरावर आग्रह धरणार असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले. जाचक अटी लावून पीक विमा लाभ देण्यास टाळाटाळ झाल्यास विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.दारव्हा तालुक्यात सर्व्हेक्षण प्रारंभपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण सुरू झाले. १८ ते २८ आँक्टोबरपर्यंतच्या पावसामुळे ३६ हजार ९६ शेतकऱ्यांचे २० हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने दिला. शुक्रवारी रात्रभर २२.७७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे १० हजार हेक्टरच्यावर नुकसान झाले. दरम्यान, शनिवारपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. सवेक्षणानंतरच प्रत्यक्षात किती नुकसान झाले, हे कळणार आहे.

टॅग्स :agricultureशेती